Donald Trump-Putin : डोनाल्ड ट्रम्प-पुतिन यांची दोस्ती संपवण्यामागे एक महिला, तिच्यामुळेच आज दुश्मनी

Donald Trump-Putin : आज डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन परस्परांचे चांगले मित्र राहिलेले नाहीत. ट्रम्प यांच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका आणि रशिया संबंध बऱ्यापैकी सुधारले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात हे दोन्ही देश परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात. ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री तुटण्यामागे एक महिला जबाबदार आहे.

Donald Trump-Putin :  डोनाल्ड ट्रम्प-पुतिन यांची दोस्ती संपवण्यामागे एक महिला, तिच्यामुळेच आज दुश्मनी
Trump and Putin
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2025 | 12:52 PM

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे रशिया आणि पुतिन यांच्याबद्दल जे विचार बदललेत, त्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. एकवेळ होती, जेव्हा ट्रम्प पुतिन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करायचे. त्यांना जीनियस, स्मार्ट सुद्धा म्हटलं होतं. ट्रम्प यांनी जाहीरपणे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्यावर टीका केली होती. पण तेच ट्रम्प आता युक्रेनला शस्त्रास्त्र, फंडिंग आणि डिप्लोमॅटिक सपोर्ट देण्यात सर्वात पुढे आहेत. नाटोला आधी कमकुवत बोलणारे ट्रम्प आता त्याच नाटोसोबत मजबुतीने उभे आहेत. ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक झालेला हा बदल कुठल्या जियो-पॉलिटिकल एक्सपर्टचा सल्ला, सुरक्षा एजन्सीची ब्रीफिंग याचा रिझल्ट नाहीय. यामागे आहे ती, अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प. TV9 ला व्हाइट हाऊसमधील एका जवळच्या सूत्राकडून ही एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

TV9 ला व्हाइट हाउसच्या जवळच्या सूत्राने सांगितलं की, ट्रम्प यांच्या भूमिकेत झालेल्या बदलाच मोठ कारण मेलानिया ट्रम्प आहे. युक्रेनमध्ये निरपराधांचे जीव जात आहेत, या गोष्टीची त्या सतत डोनाल्ड ट्रम्प यांना आठवण करुन देत असतात. ट्रम्प यांच्या विदेशी सल्लागारांच्या बैठकीत अनेकदा मेलानिया सहभागी झाल्या. पुतिन यांच्याबाबत नरमाई म्हणजे निरपराधांच्या मृत्यूवर मौन असं मेलानिया स्पष्टपणे बोलल्या आहेत. मेलानिया यांचा जन्म स्लोवेनियामध्ये झाला आहे. तो पूर्व युरोपातील एक देश आहे. स्लोवेनियावर सोवियत युनियनचा प्रभाव होता. पण ते रशियापासून लांब होते. मेलानिया यांना रशियाच्या आक्रमक धोरणांचा चांगला अनुभव आहे.

युद्धानंतर या महिलेने काय लिहिलेलं?

रशियाने फेब्रुवारी 2022 साली युक्रेनवर हल्ला केला. त्यावेळी मेलानिया यांनी टि्वटरवर हे युद्ध भयावह आहे असं लिहिलेलं. माझ्या प्रार्थना युक्रेनसोबत आहेत. त्यांनी रेड क्रॉससाठी दान करण्याच सुद्धा अपील केलं होतं. पहिल्यांदा त्यांनी कुठल्या आंतरराष्ट्रीय मुद्यावर इतक्या स्पष्टपणे भूमिका मांडली होती. ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल तिथूनच सुरु झाला.

जेलेन्स्की यांच्यासाठी मजबूत आशेचा किरण

आता ट्रम्प रशियाविरोधात कठोर शब्द वापरत असतील आणि अमेरिकन मिसाइल्स युक्रेनला त्यांच्या संरक्षणासाठी मिळाली, तर यामागे मेलानिया यांचा संवेदनशील विचार आणि नैतिक दबाव असेल. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांच्यासाठी मेलानिया कदाचित व्हाइट हाऊसमधील मजबूत आशेचा किरण आहेत.