AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेत मोठा गदारोळ, मोदींनाही थांबवावं लागलं भाषण, खरगेंनी उभे राहून थेट…काय घडलं?

सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.

संसदेत मोठा गदारोळ, मोदींनाही थांबवावं लागलं भाषण, खरगेंनी उभे राहून थेट...काय घडलं?
narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 05, 2026 | 5:32 PM
Share

PM Narendra Modi Speech : सध्या ससंदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेसनामध्ये विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकात केलेल्या दाव्यांचा आधार घेत विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच पुस्तकाचा आधार घेत चीनच्या घुसखोरीवरून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. विरोधकांना बोलू दिले जात नाही, असा दावे काँग्रेसकडून केला जातोय. आजदेखील (5 फेब्रुवारी) विरोधकांनी दोन्ही सभागृहात मोठा गदरोळ केला. विरोधकांच्या या पवित्र्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले भाषण थांबवावे लागले.

नेमकं काय घडलं?

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होऊ शकले नाही. त्यानंतर राज्यसभेत मात्र त्यांनी भाषण केले. परंतु भाषण सुरू होतानाच काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले. मोदी भाषणाला उभे राहताच काँग्रेसच्या सर्व खासदारांनी जोरदार घोषणाबाजी चालू केली. ‘विरोधी पक्षनेत्याला बोलू द्या,’ ‘हुकूमशाही चालणार नाही’, अशा घोषण विरोधकांनी दिल्या. त्यामुळे राज्यसभेत काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला.

मल्लिकार्जून खरगे यांनी उभे राहून…

दुसरीकडे विरोधकांचा गोंधळ आणि घोषणाबाजी याला न जुमानता मोदी यांनी आपले भाषण चालूच ठेवले. मोदींचे भाषण चालूच असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी आसनावर उभे राहात घोषणा दिल्या. त्यामुळे काँग्रेसचे खासदारही आक्रमक झाले. ही स्थिती पाहता मोदी यांना काही काळासाठी आपले भाषण थांबवावे लागले. भाषण थांबवून मोदी यांनी खरगे यांच्यावर टीका केली. खरगे यांनी वयाचा विचार खाली बसून घोषणा द्याव्यात, असा टोला त्यांनी लगावला.

विरोधकांचा सभात्याग, मोदींनी भाषण सुरूच ठेवले

दरम्यान, घोषणाबाजी चालू असताना मोदी यांनी आपले भाषण चालूच ठेवले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी आम्हाला बोलू दिले जात नसल्याचा दावा करत हा सभात्याग केला. मोदींनी आपल्या भाषणात अमेरिका-भारत व्यापार करार, युवकांची शक्ती यावर भाष्य केले.

Follow Us
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.