AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात घाडमोडींना वेग, मनोज जरांगे पाटील थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात, मोठी बातमी समोर

मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातचा प्रयत्न प्रकरणातील संशयीत आरोपी अमोल खुणे याची जामिनावर सुटका झाली आहे, त्यानंतर त्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्याला आता जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जालन्यात घाडमोडींना वेग, मनोज जरांगे पाटील थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात, मोठी बातमी समोर
मनोज जरांगे पाटील Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 5:30 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा प्रयत्न प्रकरणातील संशयीत आरोपी अमोल खुणे याची जामिनावर सुटका झाली आहे, जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती, या प्रकरणात माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी त्याने पोलीस अधीक्षकांकडे केली होती, तसेच यावेळी बोलताना काही गंभीर आरोप देखील त्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर केले होते, मला आंदोलनाबाबत सगळं माहिती आहे, योग्य वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार आहे, असं त्याने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे.  या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी खुणेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

मनोज जरांगे पाटील यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे, अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करा, दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. हे सगळं धनंजय मुंडे हेच घडवून आणत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. अमोल खुणे हा जर धुतल्या तांदळाचा होता तर त्याने म्हणायला पाहिजे होतं, पाचही लोकांच्या धनंजय मुंडे यांच्यासहीत नार्को टेस्ट करा, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

खुणेच्या आईने आणि पत्नीने सांगितलं होतं की तो  पीत आहे. हे पोरग असं आहे की स्वतः सुखाने खायचं नाही आणि घरच्याला देखील सुखाने तुकडे खाऊ द्यायचे नाही. याला कोणीतरी फुस लावेल म्हणून मी एसपींना सांगितले होते. त्याने माझ्यावर आरोप केले ते सिद्ध करावे लागतील, नाहीतर पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुणे याला दिला आहे. तसेच  दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करण्यासाठी तू आपल्या जातीला डाग लावतो का? असा सवालही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल
स्पिरीट ऑफ मुंबईच्या नावाखाली लोकलचा जीवघेणा प्रवास! व्हिडीओ व्हायरल.
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले.
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल
चंद्रपूर : भाजप-ठाकरे गटाची युती, मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल.