META चा सर्व्हर डाऊन, फेसबुक आणि इंस्टाग्राम ठप्प झाल्याने नेटकरी हैराण
फेसबुक आणि इंस्टाग्राम सेवा चालवणाऱ्या मेटाचा सर्व्हर शुक्रवारी रात्री अचानक डाऊन झाल्याने जगभरातील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सना सेवा ठप्प पडल्याने अडचणीचा सामना करावा लागला.

फेसबुक चालवणाऱ्या कंपनी मेटाचा सर्व्हर डाऊन झाल्याने फेसबुक आणि इंस्टाग्राम ठप्प झाल्याने जगभरातील इंटरनेट युजर्सना मोठा फटका बसला आहे. फेसबुक आणि मेटाचा प्रसिद्ध फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अचानक काम करेनासा झाल्याने भारतासह जगभरातील इंटरनेट युजर्सचा हिरमोड झाला आहे. हजारो लोकांना त्यांचा अकाऊंट एक्सेस करताना अडचणींचा सामाना करावा लागला आहे.
Meta कंपनीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स Facebook आणि Instagram दोन्ही सर्व्हर शुक्रवारी साडे सात वाजण्याच्या सुमारास अचानक ठप्प झाले.त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर एप्स आणि अकाऊंट दोन्हींवर करताना युजर्सना अडचणीचा सामना करावा लागला. फेसबुकच्या अधिकृत साईटवर पेज रिफ्रेश केल्यानंतरही पेज रिफ्रेश होईना आणि स्क्रीनवर पांढरा पडदा दिसू लागला. तर काहींना Sorry,Something went Wrong असा संदेश होम पेजवर दिसू लागला. या सेवा ठप्प झाल्यानंतर आम्ही या बिघाडावर काम करत आहोत, लवकरच त्रूटी दूर केल्या जातील असे संदेश येऊ लागले.
युजर्सच्या रिपोर्टमुळे कळाले की ही समस्या कोणा एका खास भागापर्यंत नव्हे तर अनेक देशांच्या लोकांना एकाच वेळी होत आहे. भारतातील अनेक शहरातील युजर्सना मेटाच्या मालिकीच्या प्लॅटफॉर्म वापरताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. अर्ध्या तासांहून अधिक वेळ हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास फेसबुक पुन्हा सुरु झाले. त्यामुळे फेसबुकच्या युजर्सनी लागलीच मिम्स तयार करीत शेअर करायला सुरुवात केली.
Downdetector वर देखील १२ जून सायंकाळी ७.०१ वाजता १,०४,००१ तक्रारी आल्या. ५६ टक्के फेसबुक युजर्सना फेसबुक चालवण्यात अडचणी येत होत्या. तर २५ टक्के युजर्सना अकाऊंट लॉग-इन करताना अडचणी येत होत्या आणि ११ टक्के लोकांना फेसबुकच्या वेबसाईड एक्सेस करताना अडचणीच्या सामना करावा लागला.
X वर लोकांच्या प्रतिक्रीयांचा पाऊस
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर फेसबुक डाऊन आणि इंस्टाग्राम डाऊन ट्रेंड करु लागला. कारण फेसबुक आणि इंस्टा वापरताना लोकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेकांनी एक्स प्लॅटफॉर्मवर या संदर्भात तक्रारी करु लागले. पोस्ट शेअर करत एका युजर्सने लिहिले की फेसबुक अकाऊंट लॉक-आऊट होत आहे.
येथे पोस्ट पाहा –
#facebookdown pic.twitter.com/okj7c17IPg
— Ivan_gymrat21 (@IvanPacleb) June 12, 2026
काही युजर GIF शेअर करीत आपल्या रिएक्शन देत होते. बातमी लिहिली जात होत तोपर्यंत मेटाच्या वतीने कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र, साडे सातच्या सुमारास पुन्हा सर्व्हीस सुरु झाल्याचे सांगितले जाते.
येथे पोस्ट पाहा –
Elon Musk To Mark Zuckerberg After Facebook and Instagram Both are down.. X/ Twitter Is Better..!!
#instagramdown #facebookdown #instagram #Twitter #Facebook pic.twitter.com/ShT5zhWGgM
— MAHIMUL ISLAM RAHIM (@MAHIMULX) June 12, 2026