20 निदर्शकांचा मृत्यू, 300 पेक्षा अधिक जखमी, नेपाळमध्ये हाहा:कार, शेवटी सरकारने घेतला मोठा निर्णय

नेपाळमध्ये मोठा हिंसाचार झाल्याचे बघायला मिळाले. निदर्शकांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या घरावर दगडफेक केली. तेवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी टायर टाळून महामार्ग देखील रोखला. सरकारने सोशल मीडियावर बंदी आणल्यानंतर काही लोक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

20 निदर्शकांचा मृत्यू, 300 पेक्षा अधिक जखमी, नेपाळमध्ये हाहा:कार, शेवटी सरकारने घेतला मोठा निर्णय
Nepal
| Updated on: Sep 09, 2025 | 8:04 AM

नेपाळमध्ये काही तरूण सरकारच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आणि थेट जाळपोळ सुरू झाली. सोशल मीडिया बंद करण्याच्या निर्णयामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते. यानंतर सरकारने थेट एक निवेदन जारी करून ही बंदी उठवल्याचे जाहीर केले. हिंसक संघर्षांनंतर हे पाऊल उचलण्यात आले, ज्यामध्ये 20 निदर्शकांचा मृत्यू झाला आणि 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. सरकारकडून लोकांना शांत राहण्याचे आव्हान करण्यात आले. नेपाळमधील आग आणखी भडकली आणि निदर्शन करणाऱ्या लोकांनी थेट जाळपोळ सुरू केली.

पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या घरावर दगडफेक

वृत्तानुसार, निदर्शकांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या घरावर दगडफेक केली. तेवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी टायर टाळून महामार्ग देखील रोखला. निदर्शन करणाऱ्यांनी पंतप्रधान केपी शर्मा यांच्या घरात प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी असलेल्या सुरक्षारक्षकांमुळे मोठी दुर्घटना टळली. हेच नाही तर जाळपोळ सुरू झाल्यानंतर सुरक्षा दलांना दिसताच गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले.

हिंसाचारानंतर गृहमंत्र्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा 

या सर्व पार्श्वभूमीवर नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. हिंसाचाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असून ते पद सोडू इच्छित आहेत. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले की, सोशल मीडियावरील बंदी उठवली जाणार नाही. भलेही त्यांना त्यांचे पद का सोडावे लागेल. मात्र, वाढता विरोध बघता शेवटी सोशल मीडियावरील बंदी ही उठवण्यात आली.

नेपाळमधील घडामोडींना मोठा वेग

असे सांगितले जाते की, या घटने मागे चीनचा हात आहे. चीनच अशाप्रकारच्या घटना नेपाळमध्ये घडवत आहे. नेपाळमधील हिंसाचाराचे काही धक्कादायक असे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत देखील सतर्क आहे. सध्या नेपाळमधील स्थिती शांततापूर्ण असल्याचे सांगितेल जात आहे. मात्र, लोकांनी थेट संसदेत घुसण्याचा प्रयत्न देखील केला. सध्याच्या घडीला नेपाळमध्ये काही मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.