आधी मदत नाकारली आता नेपाळ वटणीवर, मानावे लागले भारताचे आभार, थेट संसदेतच..

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला. नेपाळमध्ये सर्वकाही वाहून जाताना दिसले. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारताबद्दल चुकीची विधाने करताना दिसले. मात्र, त्यानंतरही भारत सर्वकाही विसरून नेपाळच्या मदतीला धावला.

आधी मदत नाकारली आता नेपाळ वटणीवर, मानावे लागले भारताचे आभार, थेट संसदेतच..
rime Minister Balen Shah
| Updated on: Sep 02, 2026 | 7:53 PM

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताची मदत नाकारली होती. भारताने नेपाळला बचावकार्यात मदत करण्याचा हात पुढे केला. पण नेपाळकडून नकार देण्यात आला. आम्हाला पैशांची मदत करा, असे नेपाळकडून सांगण्यात आले. नेपाळमधील पुरानंतर भारत हा पहिला असा देश होता, जो नेपाळमध्ये मदतीकरिता सर्वात अगोदर पोहोचला. भारतीय लष्कराची विमाने नेपाळमध्ये तातडीने मदत घेऊन पोहोचले. नेपाळमधील पुरात आतापर्यंत 1100 लोकांचे जीव गेली आहेत. अगोदर बचावकार्यात नेपाळने मदत नाकारली. मात्र, पुन्हा स्वत:हून मदत मागितली. नेपाळला भारताने सर्व मदत दिली. गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसले. मात्र, आता बालेन शाह ठिकाण्यावर आले. त्यांनी आता भारताचे आभार मानले.

बालेन शाह यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून भारतासोबत त्यांचे संबंध फार काही ठीक नव्हते. नेपाळच्या संसदेत बोलताना त्यांनी म्हटले की, आपले मित्र देश चीन आणि भारत यांनी आपल्याला मदत केली. तालमेल साधला. भारताने टेक्निशियन पाठवले. पहिल्या दिवशी झालेले नुकसान आणि तिथे पोहोचणे कठीण झाले. अशा काही ठिकाणे होती, जिथे पोहोचणेही कठीण होते.

हवाई तपास करण्यात आला. भारतीय टेक्निशय दूर परिसरातपर्यंत पोहोचले. ही एक वेगळी स्थिती होती. त्याठिकाणी चिखल आणि खाण प्रचंड होती. फक्त खोदकाम करणारेच नाही तर आर्मी पोलिस फॉर्स त्यांनीही तिथे उभे राहण्यास जागा मिळत नव्हती. बालेन शाह यांनी रसुवा आणि नुवाकोट येथील भयंकर स्थिती सांगितली. तिथेल लोकांना वाचवण्याची गरज असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. आम्ही या वाईट काळात देशाच्यासोबत आहोत. ही घटना सकाळी 8.30 च्यादरम्यान घडली.

ज्यावेळी याबाबत आम्हाला समजले, त्यानंतर आम्ही अलर्ट जारी केला. सकाळी 10.30 वाजता आमची टीम तयार होती. हेलिकॉप्टर्सच्या मदतीने आम्ही लोकांना वाचवण्यास सुरूवात केली. रात्री सातच्या दरम्यान पीएम रिलीफ फंडच्या मदतीने लोकांना मदत पोहोचवण्यास आम्ही सुरूवात केली. यादरम्यान त्यांनी पुढे म्हटले की, भारताने आम्हाला तात्काळ मदत पोहोचवली. भारतीय वायुसेनेने तात्काळ विमानांनी मदत पोहोचवली. भारताने जवळपास 68.5 नेपाळमध्ये मदत पोहोचवली

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us