
नेपाळ सध्या धुमसत आहे. निदर्शकांची आंदोलनं, हिसांचार. जाळपोल, मंत्र्यांचे राजीनामे यामुळे देशात (Nepal Protest) अराजक माजलं आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही राजीनामा दिला. सोशल मीडिया (Social Media) वर लावलेला बॅन, भ्रष्टाचार आणि अनेक गोष्टींचा उद्के होऊ नेपालची जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांच्या आंदोलनाने हिंसक स्वरूप धारण केलं. यामध्ये कमीत कमी 20 लोकांचा मृत्यू आणि शेकडो जखमी झालेत.
खरंतर, नेपाळ सरकारने फेसबुक, यूट्यूब, एक्स (ट्विटर), इंस्टाग्रामसह सुमारे 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. तरूणांनी याचा निषेध करत आंदोलन केलं आणि त्याच लोणदेशभर पसरलं, ज्यामुळे नेपाळ आता राजकीय आणि सामाजिक संकटातून जात आहे. जर कोणत्याही देशात अशी परिस्थिती उद्भवली तर सरकारी मालमत्तेसोबतच मोठ्या उद्योगपतींनाही नुकसान सहन करावे लागते. याच नेपाळमधील सर्वांत श्रीमंत माणूस कोण आहेल हे तुम्हाला माहीत आहे का ?
विनोद चौधरींचा मोठा व्यवसाय
नेपाळची लोकसंख्या सुमारे 3 कोटी आहे. नेपाळ हा एक लहान आणि विकसनशील देश असला तरी, येथील एक उद्योगपती आहे ज्याने आपला व्यवसाय जगभर प्रसिद्ध केला आहे. त्यांच नाव विनोद चौधरी असून ते नेपाळचे पहिले आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे अब्जाधीश मानले जातात. ते सध्या नेपाळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
फोर्ब्सच्या (Forbes) अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेले विनोद चौधरी यांची वेगवेगळ्या सोर्सद्वारे 1.8 ते 2 अब्द अमेरिकन डॉलर्स (सुमारे 14,700 ते 16,700 कोटी रुपये) मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. ते नेपाळमधील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांच्या व्यवसायाद्वारे जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. विनोद चौधरी यांचा बहुआयामी व्यवसाय आहे. ते सीजी कॉर्प ग्लोबल ग्रुपचे मालक आहेत, ज्या अंतर्गत सुमारे 160 कंपन्या आणि 80 ब्रँड्स काम करतात. त्यांचा व्यवसाय 30 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये अन्न उद्योग, बँकिंग, रिअल इस्टेट, आतिथ्य ( Hospitality), पायाभूत सुविधा आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
लोकप्रिय ब्रँड ‘वाई वाई नूडल्स’ (Wai Wai Noodles) मुळे विनोद चौधरी यांना सर्वाधिक ओळख मिळाली. नूडल्सचा हा ब्रँड नेपाळ आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि कंपनीच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग त्यातून येतो. अन्न उद्योगातील या यशामुळे चौधरी यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.
भारतातही लोकप्रिय
भारतात, Wai Wai Noodlesची थेट स्पर्धा नेस्लेच्या मॅगी आणि आयटीसीच्या यिप्पीशी आहे. भारतातील इन्स्टंट नूडल्स बाजारपेठेत या कंपनीचा 25% पेक्षा जास्त वाटा आहे आणि तिची वार्षिक उलाढाल 8 अब्ज रुपये (96.2 दशलक्ष डॉलर्स) आहे. याशिवाय, CG Corp हॉटेल, रिअल इस्टेट, सिमेंट आणि ऊर्जा क्षेत्रातही चौधरींची कंपनी काम करते. या समूहाचे हरियाणातील गुरुग्राम येथेही कार्यालय आहे आणि कंपनीच्या बिझनेसचा भारतातही विस्ता होत आहे.
ते फक्त बिझनेसमध्येच नव्हे तर समाजसेवेतही सक्रिय असतात. त्यांची कंपनी शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती निवारण कार्यात मोठ्या प्रमाणात योगदान देते. नेपाळमधील विनाशकारी भूकंपाच्या वेळी चौधरी ग्रुपने मदत आणि पुनर्बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली. बिनोद यांच्या पत्नीचे नाव सारिका आहे. त्यांना तीन मुले आहेत.
छोट्या व्यवसायाचं मोठ्या बिझनेसमध्ये रुपांतर
विनोद चौधरी यांनी काठमांडूमधील एका छोट्या किराणा दुकानातून त्यांचा व्यवसाय प्रवास सुरू केला. हळूहळू त्यांनी व्यवसायाला एक नवीन दिशी दिली आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. आज, ते फक्त नेपाळमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही तर एक उद्योगपती देखील आहेl. मर्यादित संसाधने असलेल्या देशातही कोणीही जागतिक अब्जाधीश बनू शकतो हे त्यांच्या विचारसरणीने आणि कठोर परिश्रमाने हे सिद्ध केले आहे.