Helicopter Crash : दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळले, हवेतच जोरदार धडक, थरकाप उडवणारा भीषण अपघात!

या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनुसार काही लोक दोन्ही हेलिकॉप्टर लँड होण्याची वाट पाहात आहेत. आपला अपघात होऊ शकतो, हे लक्षात येताच दोन्ही हेलिकॉप्टरच्या पायलट अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

Helicopter Crash : दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळले, हवेतच जोरदार धडक, थरकाप उडवणारा भीषण अपघात!
helicopter crash in nepal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 5:39 PM

Helicopter Accident : आजकाल विमान अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. खराब हवामान, तांत्रिक बिघाड, पायलटची चूक यामुळे अपघात होताना पाहायला मिळत आहेत. विमानासोबतच हेलिकॉप्टरचेही अलिकडेच काही भीषण अपघात झाले आहेत. यामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. असे असतानाच आता आणखी एक अतिशय भीषण असा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात वेगाने आलेले दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळले आहेत. या अपघातात एका भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या दुर्घटनेचा व्हिडीओही समोर आलाय.

दुर्घटनेत एका भारतीय पर्यटकाचा जागीच मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसरात मंगळवारी दोन हेलिकॉप्टरने एकमेकांना जोरदार टक्कर दिली. हे दोन्ही हेलिकॉप्टर जमिनीवर लँड करत होते. बर्फाळ प्रदेशात हा अपघात झाला. या दुर्घटनेत एका भारतीय पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. नेपाळमधील सोलुखुम्बु जिल्ह्यात घडला. पोलिसांनी वृत्तसंस्था एएफपीला सविस्तर माहिती दिली. या माहितीनुसार या अपघातात अन्य एक व्यक्ती जखमी झाली आहे.

Loading...

व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय?

सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनुसार काही लोक दोन्ही हेलिकॉप्टर लँड होण्याची वाट पाहात आहेत. आपला अपघात होऊ शकतो, हे लक्षात येताच दोन्ही हेलिकॉप्टरच्या पायलट अपघात टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दोन्ही पायलटना हा अपघात टाळता आला नाही. एका हेलिकॉप्टरचे पंखे दुसऱ्या हेलिकॉप्टरला लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर दोन्ही हेलिकॉप्टर थेट जमिनीवर आदळले आहेत. या भीषण अपघातावेळी खाली उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच घबराट पसरली. उपस्थित लोक सैरावैरा पळत असल्याचे दिसत आहे.

नेपाळमध्ये हवाई वाहतुकीपुढे आव्हान

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही हेलिकॉप्टर सोबतच लँडिंग करण्याचा प्रयत्न होते. त्यातूनच हा अपघात झाला. नेपाळमध्ये सामानाची ने-आण, गिर्यारोहकांची मदत तसेच पर्यटकांच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टरचा वापर अनेकदा केला जातो. नेपाळमधील हवामान आव्हानात्मक असते. त्यामुळे अशा स्थितीत हेलिकॉप्टर किंवा विमान चालवणे कठीण होऊन बसते आणि अपघाताची घटना घडते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us