
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या निवासस्थानातून उचलून नेले. ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना हथकडी घालून न्यूयॉर्क येथील एका कोठडीत नेले जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.तेव्हा त्यांनी त्यांचे तोंड उघडले. आणि केवळ पाच शब्द ते बोलले. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेला नेल्यानंतर सुमारे २४ तासांना सार्वजनिकपणे मादुरो यांचा व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. त्यांना पुढच्या आठवड्यात कोर्टात सादर केले जाणार आहे.
‘द मिरर’ च्या बातमीनुसार व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना व्हेनेझुएलावरील सैनिक कारवाई दरम्याने अमेरिकन सैनिकांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्यांचा व्हिडीओ जवळपास २४ तासांच्या अंतराने रिलीज झाला आहे. त्यात त्यांनी आपले तोंड उघडले आहे. आज न्यूयॉर्क येथील डिटेन्शन सेंटरमध्ये त्यांना नेतानाचा हा व्हिडीओ आहे. यात अमेरिकेत नेल्यानंतर २४ तासानंतर सार्वजनिकरित्या राष्ट्राध्यक्ष व्हेनेझुएला यांनी आपले तोंड उघडले आहे. ते काही तर बोलताना दिसले आहेत.
येथे पाहा पोस्ट –
Maduro perp walk. pic.twitter.com/e1Maaun5EK
— Paul Mauro (@PaulDMauro) January 4, 2026
मादुरा यांना पुढच्या आठवड्यात एका फेडरल कोर्टाच्या समोर हजर केले जाणार आहे. तेथे त्यांच्यावर कथित अंमली पदार्थांच्या तस्करी आणि अवैध शस्रास्रांच्या दलाली प्रकरमात अनेक आरोप लावले जात आहेत. ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की मादुरो यांच्या अटकेनंतर लागलीच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे सरकार ताब्यात घेतले असून नवीन सरकार येईपर्यंत अमेरिकेचे शासन येथे चालणार आहे.
डीईए एजेंट्सच्या कडेकोट बंदोबस्तात असलेले मादुरो हे गुड नाईट आणि हॅप्पी न्यू इयर म्हणताना दिसत आहेत. मात्र, डीईएचे अधिकारी त्यांना पोलीस कोठडीत नेताना दिसत आहेत. सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हातात हथकडी घातलेले मादुरो यांनी शुभ रात्री आणि नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही युजरनी मादुरो यांच्या टोपीची टींगल करताना हसत आहेत. तर काहींनी त्यांच्या संदेशाचीची चेष्टा केली आहे. काही युजर्सने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे.तर काहींनी इराक आणि व्हेनेझुएला यांच्यावर हल्ल्याचे निमित्त शोधल्याचे म्हटले आहे.