चाबहार बंदर हादरले, अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, भारताच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. त्यामध्येच आता अमेरिकेने इराणवर हल्ले अधिक तीव्र केली आहेत. जगात तणाव वाढला आहे. सलग नवव्या दिवशी अमेरिकेने मोठे हल्ले इराणवर केली आहेत. इराणच्या पायाभूत सुविधांना टार्गेट केले जातंय.

चाबहार बंदर हादरले, अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, भारताच्या..
US attack on Iran
| Updated on: Jul 20, 2026 | 8:32 AM

इराण आणि अमेरिका यांच्यात प्रचंड तणाव वाढला आहे. सलग नवव्या दिवशी अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले सुरू ठेवले. अमेरिकेच्या सैन्याने रात्री इराणवर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी भीषण हल्ले इराणवर करण्याचे आदेश दिले. सायंकाळी 7 वाजल्यापासून अमेरिकेच्या हल्ल्यांना सुरूवात झाली. इराणविरोधात मोठा मोर्चा अमेरिकेने सुरू केला. अमेरिकेच्या फायटर जेट्स आणि मिसाईल इराणवर टाकण्यात आली. अमेरिकेकडून आता इराणच्या पायाभूत सुविधांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. सेंटकॉमने स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरक्षित करायची आहे आणि व्यापारी जहाजांना होर्मुज खाडीतून सुरक्षित मार्ग द्यायचा आहे. इराणचे सैन्य उद्धवस्थ करायचे आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकेने उत्तर आणि दक्षिण शहरांना टार्गेट करून हल्ले केले.

इराणी मीडियाच्या म्हणण्यानुसार, होरमोजगान आणि बुशेहरमध्ये जोरदार धमाक्यांचे आवाज ऐकू आली. चाबदार बंदरालाही पुन्हा एकदा अमेरिकेकडून टार्गेट करण्यात आले. कोनाकमध्ये इराणी एअर डिफेंस सिस्टम सक्रिय झाले. ब्रिटिश सैन्याच्या रिपोर्टनुसार, ओमान किनारपट्टीजवळ होर्मुज खाडीमध्ये एका जहाजाला भीषण आग लागली. मात्र, हे जहाज नक्की कोणत्या देशाचे होते, याबाबत अधिक काही माहिती ही मिळू शकली नाही.

इराण किंवा अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात या जहाजाला आग लागल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेने हल्ले तीव्र करताच इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. या तणावात अमेरिकेचे दूतावास अलर्ट मोडवर आहेत. यासोबतच त्यांनी म्हटले की, इराणच्या मनामा येथे काही अज्ञात लोकांकडून टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. यादरम्यान अमेरिकी नागरिकांनी अलर्ट राहवे असेही त्यांनी म्हटले. चाबहार बंदर भारताने विकसित केले आहे. हे भारतासाठी महत्वाचे बंदर आहे. कोट्यावधी रूपये भारताने तिथे खर्च केली आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. यासोबतच जर अजून काही दिवस होर्मुज खाडी बंद राहिली तर मोठे संकट निर्माण होऊ शकते. भारतातही इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका बसताना दिसत आहे. महागाईमध्ये वाढ झाली.

Follow Us