दुश्मन करणार नाही असे काम थेट इराणच्या मित्रांनीच केले, मोठा दणका, थेट..

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद टोकाला गेला. मागील सात दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सुरू आहे. अमेरिकेच्य पाठिशी अनेक देश उभे आहेत. इराण एकटाच लढताना दिसत आहे. इराणमधील स्थिती भीषण आहे.

दुश्मन करणार नाही असे काम थेट इराणच्या मित्रांनीच केले, मोठा दणका, थेट..
iran war
| Updated on: Mar 06, 2026 | 1:01 PM

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध पेटले आहे. हा वाद टोकाला पोहोचला. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका मोठे हल्ले करत आहे. इराणच्या प्रमुख शहरांचे मोठे नुकसान झाले. मिसाईल हल्ले केले जात आहेत. फक्त तेच नाही तर थेट इराणच्या युद्धनाैकेवर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये 87 इराणी सैनिकांचा मृत्यु झाला. युद्ध नाैकेवरील हल्ल्यानंतर थेट इराणकडून इस्त्रायलच्या परमाणू केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. हा वाद वाढत आहे. अमेरिकेच्या बाजूने अनेक देश थेट मैदानात आली. नाटो देशांनीही या युद्धाला पूर्णपणे पाठिंबा दिला. मात्र, इराणच्या बाजूने अजून देखील एक देशही पुढे आला नाही. इराण एकटाच लढत आहे. इराणच्या प्रमुख शहरांवर मोठे मिसाईल हल्ले केले जात आहेत. नागरिक गेल्या काही दिवसांपासून बंकरमध्ये अडकून पडले आहेत. इतके जास्त भीषण हल्ले होत आहेत की, नागरिकांना बंकरच्या बाहेर पडणेही शक्य होत नाही.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धानंतर फ्रान्ससारखे देश अमेरिकेच्या बाजूने पुढे आले. हेच नाही तर फ्रान्सने आपली युद्धनाैका देखील इराणच्या विरोधात पाठवली. मात्र, जगात असा एकही देश सध्याच्या घडीला नाही की, ज्याने इराणला थेट पाठिंबा दिला. अमेरिकेसाठी थेट पुढे येण्याची हिंमत काही देशांनी केली, तशी हिंमत अजिबातच कोणताही देश इराणसाठी करत नाहीये.

रशिया आणि चीन इराणचे सर्वात जवळचे मित्र आहेत. मात्र, रशिया आणि चीनही इराणच्या बाजूने मैदानात आले नाहीत. अमेरिकेचा निषेध करण्यापलीकडे रशिया आणि चीनने दुसरे काहीच केले नाही. थेट कोणताच देश यामध्ये पडत नाहीये. इराणला कोणत्याही प्रकारची मदत पुरवली जास्त नाही. इस्लामिक देशही इराणच्या विरोधात आहेत.

अमेरिका आणि इस्त्रायल इराणमध्ये मोठं मोठे हल्ले करत आहेत. पूर्ण शहरे उद्ववस्थ होत आहेत. लहान मुलांचेही जीव जात आहेत. तरीही जगातील एकही देश इराणच्या बाजूने उभा नाही. इराणच्या एका शाळेवर भीषण मिसाईल  हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात तब्बल 170 लहान मुलींचा जीव गेला, त्याचाही निषेध करण्यासाठी कोणी पुढे आली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us