Kim Jong Un : जगात नव्या युद्धाचा भडका, हुकूमशाहा किम जोंग उनने….मिसाईल अटॅकच्या माहितीने खळबळ!

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागली आहेत. या घटनेनंतर आता दक्षिण कोरियाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच या हल्ल्याबाबत दक्षिण कोरियाने खळबळजनक माहिती दिली आहे.

Kim Jong Un : जगात नव्या युद्धाचा भडका, हुकूमशाहा किम जोंग उनने....मिसाईल अटॅकच्या माहितीने खळबळ!
kim jong un
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2026 | 7:10 PM

North Korea Attack : एकीकडे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध दिवसेंदिवस चांगलेच भडकत आहे. परिणामी या युद्धाचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांवर पडत आहे. भारतात इंधन महाग झाले आहे. गॅस सिलिंडरची किंमतही वाढली आहे. या युद्धामुळे जगाची झोप अगोदरच उडालेली असताना आता जगाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत. किम जोंग उनच्या याच कृत्यानंतर आता दक्षिण कोरियाने समोर येत मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे दक्षिण कोरियाने संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या सैन्याला सज्ज राहण्यास सांगितले आहे.

दक्षिण कोरियाने नेमका काय दावा केला?

किम जोंग उन याची सत्ता असलेल्या उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले आहेत. सुरुवातीला हे क्षेपणास्त्र एकच होते, असे सांगितले जात होते. परंतु आता दक्षिण कोरियाच्या दाव्यानुसार उत्तर कोरियाने एक नव्हे तर तब्बल दहा क्षेपणास्त्रे जपानच्या दिशेने डागले आहेत. एकीकडे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांचे लष्कर संयुक्त शस्त्राभ्यास करत आहेत. असे असतानाच उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने ही क्षेपणास्त्रे डागली आहेत.

दक्षिण कोरियाने नेमकी काय माहिती दिली?

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चिफ ऑफ स्टाने दिलेल्या माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे प्योंगयांग या क्षेत्रातून डागण्यात आली. परंतु ही क्षेपणास्त्रे नेमकी किती दूर गेली, हे मात्र अद्याप स्ष्ट नाही. दुसरीकडे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही क्षेपणास्त्रे विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर समुद्रात डागण्यात आली. उत्तर कोरियाच्या या कृत्यानंतर आता दक्षिण कोरियाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.

दक्षिण कोरियाकडून काय खबरदारी घेतली जात आहे?

दक्षिण कोरियाने आपल्या सैनिकांना सीमेवर पाहारा वाढवण्यास सांगितले आहे. तसेच भविष्यकालीन संभाव्य हल्ल्यांना लक्षात घेऊन लष्कराला सज्ज राहण्याचे सांगितले आहे. दुसरीकडे घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती अमेरिका आणि जपानला देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us