AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ

इराणच्या दुतावासाने एक फुटेज जारी केले आहे. अमेरिकेने या फुटेजला दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी होर्मुझमधील सुरुंग हटवण्याचे ऑपरेशन सुरु केले आहे.

आता होर्मुझवरुन इराणचे अमेरिकेला थेट आव्हान, जारी केला 60 सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ
Hormuz video
| Updated on: Apr 13, 2026 | 11:59 AM
Share

ज्या दिवशी इराणच्या युद्धासंदर्भात पाकिस्तानच्या मध्यस्थी मार्फत चर्चा सुरु होती. त्याच दिवशी इराणने एक होर्मुझमधील एक फुटेज जारी केले आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आखणीनच वाढला आहे. हे फूटेज एक दिवसाआधीचे असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या प्रकारचे अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यात इराणचे नौदल अमेरिकेच्या युद्धनौकांना इशारा देताना दिसत आहे. तसेच अमेरिकन जहाजांना हुसकावून लावताना दिसत आहे.

इराणच्या अनेक दुतावासांनी या फुटेजला जारी केले आहे. या फुटेजला अमेरिकेने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अमेरिकने उलट असा दावा केला आहे की त्याच्या दोन युद्धनौका होर्मुझमधील समुद्री सुरुंग हटवण्याचे ऑपरेशन करत आहेत.

दस्तुरखुद्द राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिकन नौदल कोणत्याही जहाजांना या मार्गाने आत प्रवेश करण्यास वा बाहेर जाण्यास अनुमती देणार नाही. ट्रम्प यांची वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा इराण कथितपणे या होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडणाऱ्या जहाजावर २ मिलियन डॉलर भरल्यानंतरच निवडक जहाजांना अनुमती देण्याची योजना आखत आहे.

इराणने इशारा देणारा ६० सेकंदाचा व्हिडीओ जारी केला

इराणी मीडियाने या व्हिडीओचा ६० सेकंदाचा भाग जारी केला आहे. यात इराणच्या IRGC एक कमांडर हे सांगत आहे की अमेरिकन नौदलाची युद्धनौका १२१ हे सेपाह नौदल स्टेशन आहे. तुम्हाला तुमचा मार्ग बदलावा लागेल. लागलीच हिंद महासागरात तुम्हाला जावे लागेल. जर या इशाऱ्याचे पालन केले नाही तर हल्ला करुन टार्गेट केले जाईल.

यानंतर पलिकडच्या बाजूने आवाज येतो की हा आघाडीची युद्धनौका १२१ आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत या मार्गातून जात आहोत. आमच्या वतीने तुम्हाला कोणताही इशारा नाही. त्यावर इराणकडून सांगितले जाते की हा अंतिम इशारा आहे. अंतिम इशारा..अंतिम इशारा या शब्दांचा पुनरुच्चार करतो.

त्यानंतर म्हटले जाते की ओमान सागरात उपस्थित सर्व जहाजांचे लक्ष वेधू इच्छीतो. हा इराणचे सेपाई नौदल आहे. जर आजबाजूला कोणतीही युद्ध नौका आढळली तर त्यापासून १० किलोमीटर अंतर राखावे. कोणताही इशाऱ्या विना त्यांच्या गोळ्या चालवण्यासाठी तयार आहोत…

अमेरिकेचा होर्मुझवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न

इकडे अमेरिकेच्या वतीने ट्रम्प यांनी रणनितीनुसार होर्मुझवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले आहे की बैठक चांगली होती. बहुतांशी मुद्यांवर सहमती झाली. मात्र, वास्तवात ज्या आण्विक मुद्यांवर सहमती व्हायला हवी होती त्यावर सहमती झाली नाही.

येथे पाहा व्हिडीओ –

ते म्हणाले की आता जगातील सर्वात ताकदवान नौदल युएस नेव्ही या मार्गावर कोणत्याही जहाजच्या येजा करण्यास अनुमती देणार नाही. ट्रम्प यांनी इराणच्या वतीने या मार्गावर लावलेल्या प्रतिबंधाना गैरजरुरी वसुली करार म्हटले आहे. जो कोणी इराणला यामार्गावरुन जाण्यास टोल देईल, त्याला खुल्या समुद्रात परवानगी दिली जाणार नाही.तसेच अमेरिका योग्य वेळी इराणला संपवण्यास तयार आहे. इराणने या मार्गाला बंद केले आहे.

Follow Us
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच