बांगलादेशच्या पंतप्रधानांविरोधातील उमेदवाराला फक्त 123 मतं

बांगलादेशच्या पंतप्रधानांविरोधातील उमेदवाराला फक्त 123 मतं

ढाका : बांगलादेशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आवामी लीगने विरोधी पक्षाचा सुपडासाफ केलाय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीगने 298 पैकी 287 जागा जिंकल्या आहेत, तर एका जागेचा निकाल अजून बाकी आहे. शेख हसीना सलग चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत.

बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) ने आरोप केलाय, की या निवडणुकीत फेरफार करण्यात आली आहे. पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याचीही मागणी विरोधकांकडून येत आहे. कारण, विरोधकांना फक्त सहा जागा मिळाल्या आहेत. बीएनपीने 2014 च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. वाचाशेख हसीना यांच्या आयुष्यातील 9 महत्त्वाच्या गोष्टी

शेख हसीना यांच्या विजयाचं श्रेय त्यांच्या कामाला जातं. पाकिस्तानला मागे टाकत बांगलादेशने जीडीपीमध्ये मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे शेख हसीना यांच्याविरोधात उभा राहिलेल्या उमेदवाराला फक्त 123 मतं मिळाली. शेख हसीना यांना 229539 मतं मिळाली. वाचामैदान गाजवणारा बांगलादेशी क्रिकेटर मुशरफी मुर्तझा निवडणुकीत जिंकला की हरला?

हसीना सरकारवर मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप नेहमीच लावण्यात येतो. शिवाय मीडियाचा आवाज दाबल्याचाही आरोप शेख हसीना सरकारवर असतो. पण या आरोपाचं नेहमीच खंडण केलं जातं. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू झाला.

मोदींकडूनही विजयाच्या शुभेच्छा

बांगलादेश हा भारताचा नैसर्गिक मित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. शेख हसीना यांनीही पंतप्रधान मोदींचे शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *