ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या दाव्यापेक्षाही मोठे नुकसान, पाकिस्तानचा डोजियरमधून ‘कबूलनामा’

पाकिस्तानकडून ऑपरेशन सिंदूर दरम्यान अनेक वेळा खोटी माहिती देण्यात आली. परंतु पाकिस्तानचा खोटारडेपणा त्यांच्या डोजियरमधून उघड झाला आहे. भारताच्या दाव्यापेक्षाही मोठे नुकसान पाकिस्तानचे झाले आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या दाव्यापेक्षाही मोठे नुकसान, पाकिस्तानचा डोजियरमधून कबूलनामा
पाकिस्तानचा खोटेपणा डोजियरमधून उघड
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 03, 2025 | 1:13 PM

भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठे यश मिळावले. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केली. या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या डोजिअरमधून मोठा खुलासा झाला आहे. भारताकडून करण्यात आलेल्या दाव्यापेक्षाही जास्त नुकसान पाकिस्तानचे झाले आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. परंतु त्यानंतर पाकिस्तानी सेनेकडून भारतावर हल्ला करण्यात आला. भारताने हे सर्व हल्ले परतवून लावले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचा एअरबेस आणि सैन्य ठिकाणांवर हल्ला केला. त्यात पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले.

खरी माहिती पाकिस्तानकडूनच उघड

पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर दरम्यान अनेक वेळा खोटी माहिती पसरवली आहे. परंतु पाकिस्तानच्या डोजियरमधून पाकिस्ताचा खोटरडेपणा उघड झाला आहे. पाकिस्तानच्या डोजियरनुसार, भारताने पाकिस्तानमध्ये मोठी कारवाई केली. पाकिस्तानमधील २० नाही तर २८ ठिकाणी हल्ले केले. त्यात पेशावर, सिंध, झांग, गुजरांवाला, भवालनगर आणि छोरसह अनेक ठिकाणी नुकसान झाले. भारतीय सैन्याने माध्यमांना दिलेल्या माहितीत पाकिस्तानवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. परंतु नेमकी कुठे कारवाई झाली, ते सांगितले नव्हते. परंतु आता पाकिस्तानच्या डोजियरमधूच ही माहिती समोर आली आहे.

भारताने पाकिस्तानच्या अनेक लष्करी ठिकाणांवर कारवाई केली. त्यात नूर खान, रफीकी, मुरीदके, सुकरुर, सियालकोट, पसरुर, चुनियान आणि सरगोधासह एकूण ११ एअरबेस आहे. नुकतेच मॅक्सार टेक्नोलॉजीजने सॅटेलाइट इमेज जारी केल्या आहेत. त्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी सैन्याचे झालेले प्रचंड नुकसान दिसत आहे.

बलूचिस्तान प्रांतात क्वेटा, तुर्बत आणि ग्वादरमध्ये भारताने कारवाई केल्याचे डोजियरमध्ये म्हटले आहे. तसेच खैबर पख्तूनख्वा (केपी) मध्ये पेशावर आणि डेरा इस्माइल खान याला टारगेट केले गेले. गिलगिट- बाल्टिस्तानमधील स्कार्दूमध्येही भारताने कारवाई केल्याचे म्हटले आहे. भारताने पाकिस्तानच्या मुरीद एअरबेस, रफीकी एअरबेस, मसरूर एअरबेस आणि समुंगली एअरबेसला टारगेट केले होते.