पाकिस्तानला स्वप्नातही वाटलं नव्हतं अशा ठिकाणी हल्ला, अख्खा देशच हादरला,थेट…

अफगाणिस्तानने इस्लामाबादमधील पाकिस्तानी लष्करी तळावर ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला आहे. पाकिस्तानने या हल्ल्याची पुष्टी केली नसली तरी, इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

पाकिस्तानला स्वप्नातही वाटलं नव्हतं अशा ठिकाणी हल्ला, अख्खा देशच हादरला,थेट…
अफगाणिस्तानने पाकला केलं लक्ष्य
Image Credit source: social media
| Updated on: Mar 14, 2026 | 8:19 AM

सतत धुमसणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. याचदरम्यान अफगाणिस्तानच्या वायूसेनेने शुक्रवारी पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकच्या सैन्याच्या ठिकाणावर हल्ला केल्याचा दावा अफगाणी मंत्रालयाकडून करण्यात आला. अफगाण हवाई दलाने इस्लामाबादच्या फैजाबाद परिसरातील ‘हमजा’ नावाच्या एका मोक्याच्या लष्करी केंद्रावर संध्याकाळी 5 वाजता हवाई हल्ला केला असा दावा X या सोशल मीडियावरील साईटवरील एका पोस्टमध्ये अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, हा हल्ला ड्रोन विमानांचा वापर करून करण्यात आला आणि त्यामध्ये लष्करी केंद्रातील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची मोठी जीवितहानी तसेच विध्वंस झाल्याचा दावाही मंत्रालयाने केला आहे. लष्करी तळावर हल्ल्यामुळे पाक चांगलाच हादरला आहे.

मोठ्या हल्ल्याचा दावा

या हल्ल्यात त्या ठिकाणावरील लष्करी ठिकाणं नष्ट झाली, ज्यात कमांड सेंटर, डेपो आणि सैनिकांसाठी राहण्याची जागा यांचा समावेश होता, असंही एका वेगळ्या पोस्टमध्ये, अफगाण संरक्षण मंत्रालयाने नमूद केलं. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त ड्युरंड रेषेवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा कथित हल्ला झाला आहे. अलीकडच्या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई तसेच तोफगोळ्यांचे हल्ले केले असून दोन्ही देशांमधील तणाव वाढतानाच दिसत आहे.

अफगाणिस्तानचा इशारा

यापूर्वी, पाकिस्तानने काबूल, पक्तिया आणि कंधारमध्ये दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले होते. या कारवाईला “गजाब लिल हक” असे नाव दिल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला होता.  मात्र हल्ले काबूलच्या निवासी भागात झाले, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि महिला आणि मुलांसह डझनहून अधिक जण जखमी झाले असा दावा अफगाणिस्तानने केला.  काबूलच्या पुल-ए-चरखी भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य मिशनेतर्फे सांगण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

मात्र अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत हे तर सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याची टीका केली आहे. पाकिस्तानच्या या कारवायांना चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी यापूर्वीच दिला होता. त्यानंतर पाकच्या तळावर हल्ला केल्याचा दाव करण्यात आला असून यामुळे अख्खा देश हादरला आहे.

पाकिस्तानकडून पुष्टी नाही

दरम्यान हमजा लष्करी तळावरील कथित हल्ल्याची पाकिस्तानने पुष्टी केलेली नाही. मात्र असं असलं तरीही या घटनेनंतर इस्लामाबादमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी इस्लामाबादच्या प्रवेशद्वारांवर कडक देखरेखीचे आदेश दिले आहेत. इस्लामाबादकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली आहे.

एकीकेड हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष वाढत असतानाच, पाक व अफगाणिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी चीनने राजनैतिक प्रयत्न वाढवले ​​आहेत. अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मुल्ला अमीर खान मुत्ताकी यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. चीनने दोन्ही बाजूंना लष्करी संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला आहे.

 

Follow Us