
पाकिस्तानने रविवारी रात्री अफगाणिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. रिपोर्ट्सनुसार रात्री आठच्या सुमारास अफगाणिस्तानच्या पक्तिका, बरमल भागासह उत्तरी वजीरिस्तानच्या शवालमध्ये पाकिस्तानी फायटर जेट्समधून बॉम्ब वर्षाव करण्यात आला. त्या शिवाय अफगानिस्तानच्या पक्तिया आणि खोस्त प्रांतात एअर स्ट्राइक झाल्याची सूचना आहे. नंगरहारच्या लालपूर जिल्ह्याच्या सीमेवर अफगान तालिबान आणि पाकिस्तानी सैन्य पथकांमध्ये झडप झाली आहे. पाकिस्तानी सैन्य बॉर्डरच्या दोन्ही बाजूला आणि टीटीपीच्या तळांना लक्ष्य करत आहे.
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानात मोठा एअर स्ट्राइक केला होता. पाकिस्तानने पक्तिका प्रांताच्या बरमल जिल्ह्यात हा एअर स्ट्राइक केला होता. या एअर स्ट्राइकमध्ये महिला आणि मुलांसह 46 जण ठार झाले होते.
वेगवेगळ्या भागात बॉम्बवर्षाव
अफगाणि अधिकाऱ्यांनुसार एअर स्ट्राइकमध्ये मरणाऱ्यांची संख्या वाढू शकते. रिपोर्ट्सनुसार अफगाणिस्तानवर झालेल्या एअर स्ट्राइकमध्ये अनेक गावांना लक्ष्य करण्यात आलय. मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानी फायटर जेट्सनी अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात बॉम्बवर्षाव केला होता.
पाकिस्तानचा आरोप काय?
या हवाई हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या एअर स्ट्राइकनंतर या भागात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी तालिबान तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) अलीकडच्या काही महिन्यात पाकिस्तावर हल्ले वाढवले आहेत. पाकिस्तानकडून अफगाण तालिबानवर TTP ला शरण दिल्याचा सातत्याने आरोप होतोय.
युद्धाची स्थिती निर्माण झालेली
डिसेंबरमधल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झालेली. भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानने अफगाण तालिबानची यापूर्वी मदत घेतली होती. अफगाणिस्तानात चार वर्षांपूर्वी सत्तांतर झालं, त्यावेळी देखील पाकिस्तानने तालिबानला साथ दिली होती. पण आज दोन्ही देशातील संबंध पार बिघडले आहेत.