पाकिस्तान करु शकतो अणूबॉम्बचा वापर, चीनच्या प्रोफेसरचे खळबळजनक वक्तव्य, कारणही सांगितले…

चीनचे एक प्राध्यापक जियांग यांनी म्हटले आहे की भविष्यात जर अणुयुद्ध झाले तर पाकिस्तान पहिला हल्ला करेल.पाकिस्तान हा संस्थात्मकदृष्ट्या कमकुवत देश असून, तेथील सैन्यदल अणुशस्त्रांना भारताच्या पारंपारिक सैन्यदलाविरुद्धचे शस्त्र मानते.

पाकिस्तान करु शकतो अणूबॉम्बचा वापर, चीनच्या प्रोफेसरचे खळबळजनक वक्तव्य, कारणही सांगितले...
A Chinese professor, Jiang
| Updated on: Aug 13, 2026 | 5:56 PM

चीन येथील जिओपॉलिटिक्सचे जानकार आणि व्हायरल चीनी प्रोफेसर जियांग ज्युकीन यांनी अणूबॉम्ब संदर्भात असा दावा केला आहे. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंधाची चर्चा सुरु झाली आहे. इराणवर अमेरिकेचे हल्ला आणि ट्रम्प यांच्या संदर्भात अनेक अचूक दावे केलेल्या जियांग यांनी भविष्यात कधी अणूबॉम्बचा वापर झाला तर तो पाकिस्तानच करेल असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. जियांग यांनी या दाव्याच्या समर्थनार्थ काही कारणे देखील सांगितली आहेत. पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती त्याला या अणूहल्ल्याकडे खेचून नेईल असेही जियांग यांनी म्हटले आहे.

युट्युबर राज समानी यांच्या पॉडकास्टमध्ये विविध मुद्यांवर जियांग यांनी आपली मते मांडली आहेत. जियांग यांनी सांगितले की त्यांना वाटत नाही काही दशकांपर्यंत अणूहल्ल्याची स्थिती बनू शकत नाही. ते म्हणाले की अणूयुद्धाच्या विरोधात जगभरात जरी वातावरण आहे. अशात येणाऱ्या काही वर्षात असे होण्याची शक्यता नाही. मात्र ते म्हणाले की मला व्यक्तीगत रुपाने असे वाटत नाही की आमच्या आयुष्यात कधी अणूशस्राचा वापर होईल, कारण आण्विक युद्धाबाबत जगभरात निर्बंध आहेत.

पाकिस्तान करु शकतो वापर- जियांग

जर अणुयुद्धाची स्थिती तयार झाली तर कोणता देश आधी त्याचा वापर करेल असे विचारता जियांग यांनी पाकिस्तानचे नाव घेतले. ते म्हणाले की पाकिस्तान एक आण्विक शस्रे असलेल्या कमजोर देश आहे. असे असू शकते की आपातस्थितीत स्वत:ला रोखण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक नियंत्रण प्रणाली नसतील. अशात ते अणूयुद्धाकडे वळू शकतील.

जियांग म्हणाले की पाकिस्तान गेल्या काही काळापासून सतत राजकीय फाळणी आणि आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. येथे भ्रष्टाचार आहे. अशा स्थिती जर जास्त बिघडली तर अणूबॉम्ब वापरापर्यंत पोहचू शकते. जियांग म्हणाले की भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान होणाऱ्या, संघर्षातही अणूबॉम्बचा वापर होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे.

भारताची नो फर्स्ट यूज पॉलिसी

जियांग यांनी भारताची अणूबॉम्ब संदर्भात नो फर्स्ट यूज पॉलिसीचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की भारताचा दृष्टीकोण आणि विचार हा आहे की तो आधी हल्ला करणार नाही. याशिवाय भारताच्या जवळ सुरक्षेच्या दृष्टीने अणूबॉम्ब पेक्षाही अन्य पारंपारिक क्षमता आहेत. जी भारताला मजबूत बनवतात. या तुलनेत पाकिस्तानकडे असे काहीही नाही. जियांग यांनी असा देखील तर्क सांगितला की पाकिस्ताचे सैन्य त्यांच्या आण्विक शस्रास्रांना भारताच्या पारंपारिक सैन्याच्या विरोधात एक उत्तर म्हणून पाहाते. अशात शक्यता वाढते की पाकिस्तान सैन्यदल कमजोर स्थितीमुळे हे युद्ध होऊ शकते.

मात्र, यानंतरही जियांग म्हणाले की अणूयुद्धाची शक्यता तरीही कमी आहे. कारण जर एखाद्या देशाने आण्विक हल्ला केला तर त्याची स्थिती अत्यंत खराब होईल. या हल्ल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि दबाव किंवा पलटवारचा सामना करावा लागेल. ही स्थिती अत्यंत खराब असेल . यासाठी अणूहल्ल्याचा निर्णय घेणे खूपच कठीण असेलही जियांग यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us