पाकिस्तानच्या मंत्र्याची छि थू… जगभर व्हिडीओ व्हायरल, तुमचीही मान झुकेल; असं काय घडलं?

पाकिस्तानमधील एक मंत्र्याने असे काही कृत्य केले आहे की सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी त्यांचे व्हिडीओ शेअर करत मीम्स तयार केले आहेत.

पाकिस्तानच्या मंत्र्याची छि थू... जगभर व्हिडीओ व्हायरल, तुमचीही मान झुकेल; असं काय घडलं?
Pakistan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 21, 2026 | 12:15 PM

संपूर्ण देशाचा जबाबदारी असणारा एक मंत्री सध्या सोशल मीडियावर मस्करीचा विषय ठरत आहे. कारण अनेक ठिकाणी उद्धाटनासाठी मंत्री महोदयांना बोलावण्यात येत. अशाच एका पिझ्झा हटच्या आऊटलेच्या उद्धाटनासाठी या मंत्री महोदयांना बोलवण्यात आले होते. मोठ्या धुमधडाक्यात हा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर काही वेळातच पिझ्झा हटने एक स्टेटमेंट जारी केले. त्यामध्ये त्यांनी हे आऊटलेट त्यांचे नसून बनावट असल्याचे सांगितले आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे मंत्री महोदय कोण आहेत? चला जाणून घेऊया…

आम्ही ज्या मंत्र्याविषयी बोलत आहोत ते पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आहेत. ते सियालकोटमध्ये ज्या Pizza Hut आउटलेटचे मोठ्या धूमधडाक्यात उद्घाटन केले, ते नंतर फेक निघाले. फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊन काहीच तासांत Pizza Hut पाकिस्तानने स्वतःचा स्टेटमेंट जारी करून त्या आउटलेटचे सत्य उघड केले आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ख्वाजा आसिफ हे सियालकोट कॅन्टोनमेंटमध्ये एका Pizza Hut ब्रँडच्या आउटलेटचे उद्घाटन करताना दिसत होते. फुलांची सजावट, रिबन कटिंग आणि कॅमेऱ्यासमोर हसणारे मंत्री, सर्व काही एखाद्या अधिकृत समारंभासारखे वाटत होते. पण हे साजरे फार काळ टिकले नाही.

Pizza Hut ने सांगितले – आमचा याच्याशी काही संबंध नाही…

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर Pizza Hut पाकिस्तानने सार्वजनिक निवेदन जारी करून स्पष्ट केले की, हे आउटलेट पूर्णपणे अनधिकृत आणि फेक आहे. सियालकोट कॅन्टमध्ये उघडलेले हे आउटलेट Pizza Hut पाकिस्तान किंवा Yum! Brands शी कोणत्याही प्रकारे जोडलेले नाही. Pizza Hut ने हेही स्पष्ट केले की, हे रेस्टॉरंट त्यांच्या रेसिपी फॉलो करत नाही, ना क्वालिटी, फूड सेफ्टी आणि ऑपरेशनल स्टँडर्ड्स पाळत आहे. ट्रेडमार्कच्या गैर वापराला रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

सोशल मीडियावर उडवली जात आहे खिल्ली

हा प्रकार समोर आल्यानंतर X या सोशल मीडिया अकाऊंटवर मीम्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिले की, एक रिबिन कापली आणि एक स्टेटमेंट आले – रेकॉर्ड टाइम! दुसऱ्याने मजाक करत म्हटले, ‘जेव्हा Pizza Hut स्वतः म्हणते ही आमची स्लाइस नाही.’ तर दुसऱ्या युजरने फिरकी घेत म्हटले की, रक्षा मंत्री अशा आउटलेटचे उद्घाटन करून बसले, जे स्वतःच्या ब्रँड आयडेंटिटीची रक्षा करू शकत नाही.