AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China-Pakistan : पैसे नाहीत मग विमानं पण मिळणार नाहीत, चीनने पाकिस्तानला दिला झटका

China-Pakistan : पाकिस्तान चीनकडून पाचव्या पिढीची J-35 स्टेल्थ विमानं खरेदी करणार असं बोललं जात होतं. जर, पाकिस्तानला J-10CE चे पैसे देणे परवडत नाही, मग पाचव्या पिढीची विमान विकत घेणं कसं जमणार?.

China-Pakistan : पैसे नाहीत मग विमानं पण मिळणार नाहीत, चीनने पाकिस्तानला दिला झटका
China-Pakistan
| Updated on: Jun 04, 2026 | 5:16 PM
Share

चीन आणि पाकिस्तानमध्ये घट्ट मैत्री आहे. भारत विरोध हे सुद्धा यांची मैत्री दृढ होण्यामागचं एक कारण आहे. चीन पाकिस्तानला नेहमी मदत करत असतो. आज पाकिस्तानी सैन्याकडे जी शस्त्रास्त्र आहेत, त्यात चिनी शस्त्रांचा वाटा मोठा आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा हे दिसलं होतं. पण आता चीनने पाकिस्तानला झटका दिला आहे. पाकिस्तानने चीनकडून J-10CE फायटर विमानं विकत घेतली. पण आता या विमानांमुळे पाकिस्तानची अडचणी वाढली आहे. भारताच्या राफेल फायटर जेट्सचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून ही विमानं विकत घेतली होती. पण आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानकडे आता या विमान खरेदी व्यवहाराचे द्यायला पैसे नाहीत. म्हणून चीनने 16 J-10CE विमानांची डिलीवरी थांबवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने चीनकडून एकूण 36 J-10CE फायटर विमानं खरेदीचा व्यवहार केलेला. राफेलच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने आपल्या वायू दलात या विमानांचा समावेश केला. चीनकडून J-10CE हे राफेलच्या तोडीचं विमान असल्याचा दावा केला जातो. दोन्ही विमानांची क्षमता खूप वेगळी आहे. करारानुसार चीनकडून पाकिस्तानला आतापर्यंत 20 J-10CE विमानं मिळाली आहेत. सुरुवातीची डिलीवरी चिनी बँका आणि आर्थिक संस्थांकडून लोन घेऊन शक्य झाली होती. उर्वरित 16 विमानांचे पैसे पाकिस्तानला देता आलेले नाहीत.

दक्षिण आशियात हवाई शक्तीची स्पर्धा सुरु

पाकिस्तानची परकीय गंगाजळी घटली आहे. वाढतं परदेशी कर्ज आणि IMF च्या कठोर अटी यामुळे पाकिस्तान वेळेवर पेमेंट देऊ शकत नाहीय. म्हणून चीनने उर्वरित विमानांची डिलीवरी सध्या रोखली आहे. चीनच्या या निर्णयाने पाकिस्तानी एअर फोर्सला मोठा झटका बसू शकतो. J-10CE स्क्वाड्रन्स पूर्ण क्षमतेने तैनात केली जाणार आहेत. दक्षिण आशियात हवाई शक्तीची स्पर्धा सुरु झाली आहे.

पाचव्या पिढीची विमान विकत घेणं कसं जमणार?

पाकिस्तान चीनकडून पाचव्या पिढीची J-35 स्टेल्थ विमानं खरेदी करणार असं बोललं जात होतं. जर, पाकिस्तानला J-10CE चे पैसे देणे परवडत नाही, मग पाचव्या पिढीची विमान विकत घेणं कसं जमणार?. J-10CE चीनचं 4.5 जनरेशनच विमान आहे. यात AESA रडार, आधुनिक एवियोनिक्स आणि लांब पल्ल्याचं PL-15 एयर-टू-एयर मिसाइल वाहून नेण्याची क्षमता आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात