US-Pakistan F-16 Deal : अमेरिकेचं पाकिस्तानला ताकद देणारं काम, भारताच्या पाठित खंजीर खुपसला, F-16 वरुन मोठी डील

US-Pakistan F-16 Deal : अमेरिका हा देश भारत-पाकिस्तानमध्ये कोणाच्या बाजूने आहे हे पुन्हा एकदा दिसून आलय. अमेरिकेने पाकिस्तानला ताकद देणार एक मोठं काम केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची क्षमता अजून वाढणार आहे. ते भारताविरोधात ही क्षमता वापरु शकतात.

US-Pakistan F-16 Deal : अमेरिकेचं पाकिस्तानला ताकद देणारं काम, भारताच्या पाठित खंजीर खुपसला, F-16 वरुन मोठी डील
US-Pakistan F-16 Deal
| Updated on: Nov 09, 2026 | 4:07 PM

अमेरिकेने पाकिस्तानच्या F-16 फायटर जेट्सच्या आधुनिकीकरणासाठी 686 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 5700 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारतात टीका टिप्पणी सुरु झाली आहे. टीकाकार अमेरिकेच्या दुटप्पी धोरणांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अमेरिका एकाबाजूला इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाविरोधात कारवाई करत आहे, त्याचवेळी दुसऱ्याबाजूला अणवस्त्र बाळगाणाऱ्या पाकिस्तानची ताकद वाढवत आहे असा भारतीय एक्सपर्ट्सचा सवाल आहे. या पॅकेजमध्ये अणवस्त्र नाहीय. पण विमानाची नेविगेशन, कम्युनिकेशन नेटवर्क आणि बचाव करण्याची क्षमता वाढवल्यामुळे पाकिस्तानची भारताविरुद्ध अणवस्त्र हल्ल्याची क्षमता अजून प्रभावी होईल असं एक्सपर्ट्सच म्हणणं आहे. एकीकडे पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर टीका करायची आणि दुसरीकडे पाकिस्तानची हवाई शक्ती वाढवायची हे पाठित खंजीर खुपसण्यासारखं आहे.

अमेरिकेचं हे सैन्य आधुनिकीकरण पॅकेज प्रामुख्याने पाकिस्तानी एअर फोर्सच्या F-16 फायटर जेट्सच्या अपग्रेडसाठी आहे. यात विमानांना दिशा दाखवणारी नेविगेशन सिस्टिम, कम्युनिकेशन प्रणाली आणि हल्ल्यादरम्यान डिफेन्स म्हणजे स्वत:चा बचाव करण्याची क्षमता भक्कम करणं याचा यामध्ये समावेश होतो. या सुधारणांमुळे विमानं अत्यंत अचूकतेने लक्ष्यापर्यंत पोहोचतील.चांगला समन्वय त्यांच्यात होईल आणि शत्रुच्या रडार, मिसाईल्सपासून बचाव करण्यासाठी ही जेट्स अजून सक्षम होतील.

Loading...

भारताचा आक्षेप काय?

यात अणवस्त्र किंवा त्याच्याशी संबंधित सिस्टिम नाहीय असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मात्र आधुनिक नेविगेशन आणि कम्युनिकेशन प्रणालीमुळे अणवस्त्र वाहून नेणाऱ्या विमानांची क्षमता वाढू शकते. पाकिस्तानी एअर फोर्सकडे अमेरिकेने दिलेली एफ-16 फायटर जेट्स आहेत. ती त्यांच्या एअर फोर्सचा महत्वाचा भाग आहेत. अमेरिकेच्या या निर्णयावर भारतात तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिका एकीकडे इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमावरुन कठोर भूमिका घेत आहे आणि दुसरीकडे अणवस्त्र संपन्न पाकिस्तानची ताकद वाढवत आहे. पाकिस्तान अमेरिकेचा जुना सैन्य सहकारी आहे. अलीकडच्या काही वर्षात भारत-पाकिस्तान मध्ये तीन ते चार वेळा सैन्य संघर्ष झाला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने आव्हान दिलं जातय. अशावेळी पाकिस्तानी एअर फोर्सला मजबूत करणं हे भारताच्या सुरक्षा चिंतांमध्ये भर घालण्यासारखं आहे.

F-16 वापराबाबत अमेरिका-पाकिस्तानात मूळ करार काय?

अमेरिका पाकिस्तानला जे देणार आहे, त्यामुळे त्यांच्या फायटर जेट्सची रात्री खराब वातावरणात चांगलं प्रदर्शन करण्याची क्षमता वाढणार आहे. पाकिस्तानने बालकोट एअर स्ट्राइकनंतर भारतावर एफ-16 ने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये जो करार आहे, त्यानुसार पाकिस्तानला फक्त दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या हवाई सीमांच संरक्षण करण्यासाठी या विमानांचा वापर करण्याची परवानगी आहे. पण पाकिस्तानने भारताविरुद्ध या फायटर जेट्सचा वापर केला आहे आणि ते करु शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us