4 दिवसात पाकिस्तानची भारताला तिसरी धमकी, सीमेवर खळबळ उडवणाऱ्या हालचाली, थेट…

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा तणाव बघायला मिळत आहे. त्यामध्येच पाकिस्तान देखील भारताला धमकावताना दिसतोय. सध्या पाकड्यांचा चांगलाच थयथयाट बघायला मिळत आहे.

4 दिवसात पाकिस्तानची भारताला तिसरी धमकी, सीमेवर खळबळ उडवणाऱ्या हालचाली, थेट...
India-Pakistan border
| Updated on: Jan 05, 2026 | 1:29 PM

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतावर मोठा हल्ला केला. भारताने पाकिस्तानात घुसून या हल्ल्याचा बदला घेतला. शिवाय पाकिस्तानला अडचणीत आणण्यासाठी आणि शिक्षा देण्याकरिता भारताने सिंधू जल करार निलंबित करण्याचा निर्णय भारताने घेतला. तेव्हापासून पाकिस्तानची चांगलीच चिंता वाढल्याचे बघायला मिळतंय. भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तानकडून केले जातंय. भारतात उगम पावणाऱ्या मात्र पाकिस्तानातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पाकिस्तान चिंतेत असून काही भागांमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. परिस्थिती अधिका अधिक बिकट होताना दिसतंय.  पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा मांडताना दिसतोय. भारत कशाप्रकारे त्रास देत आहे हा केविळवाणा प्रयत्न पाक करत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कोणीही दाद देत नसल्याच लक्षात येताच पाकिस्तान भारताला धमक्या देण्याचा सपाटा लावल्याचे बघायला मिळतंय. या वर्षी पाकिस्तानने भारताला धमकावण्याचा हा तिसरा प्रकार आहे. असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांनी चार दिवसांपूर्वीच भारताबद्दल दोनदा विरोधी विधाने केली होती. पाकिस्तानचे सिंधू जल करार आयोगाचे आयुक्त सय्यद मुहम्मद मेहर यांनी थेट एक निवेदनच जारी केले.

या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी थेट भारताने सिंधू जल करार निलंबित करण्याचा दावा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वैध नाही म्हटले. सिंधू करार कोणीही रद्द करू शकत नाही आणि तसे अधिकारही भारताकडे नसल्याचे त्यांनी म्हटले.  भारताने अलीकडेच चिनाब नदीवरील 260-मेगावॅटच्या दुलहस्ती टप्पा-2 जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे पाकिस्तानचा संताप आणखी वाढला असून त्यांच्या चिंतेत वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय करार कायद्यात निलंबन अशी कोणतीही बाब नाही किंवा तसे करता येत नाही. मुळात म्हणजे भारताला देखील अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे की, हा करार रद्द करू शकत नाही किंवा निलंबित वगैरे असे काही पर्यायच नाहीत. भारताला असे करता येणारच नाही. दुसरीकडे भारत अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. भारत पाकिस्तान सीमेवरही मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळतंय. काही दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला.