
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी पदरात पाकिस्तानासाठी काही पडावं म्हणून त्यांनी ट्रम्प यांचे भरभरुन गुणगान केले. अमेरिकेकडून भीख मिळवण्यासाठी त्यांनी ट्रम्प यांना भरपूर मस्कापॉलिश केलं. शहबाज शरीफ ट्रम्प यांना शांततेचा माणूस म्हणाले. जगभरातील संघर्ष मिटवण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांच कौतुक केलं. शहबाज शरीफ यांनी ट्रम्पना भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी मदत केल्याच क्रेडिट दिलं. पॅलेस्टाइन आणि इस्रायल युद्ध तात्काळ संपवण्यासाठी मुस्लिम विश्वातील प्रमुख नेत्यांना न्यू यॉर्क येथे बोलवण्यासाठी ट्रम्प यांनी जो पुढाकार घेतलाय, त्या बद्दल शहबाज शरीफ यांनी त्यांचं कौतुक केलं.
ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या साहसिक, निर्णायक आणि दृढ कार्याच कौतुक केलं. ट्रम्प यांच्या या पावलांनी भारत-पाकिस्तानमधील युद्धविराम घडवून आणण्यात मदत केली. पंतप्रधान कार्यालयाच्या स्टेटमेंटनुसार, शहबाज म्हणाले की, ‘ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे दक्षिण आशियात संभाव्य मोठा विद्धवंस टळला’
टॅरिफ करारासाठी मानले आभार
मिडिल ईस्टच्या स्थितीवर चर्चा करताना शहबाज शरीफ यांनी गाझामध्ये युद्ध तात्काळ संपवण्यासाठी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या प्रयत्नांच कौतुक केलं. त्यांनी न्यू यॉर्कमध्ये मुस्लिम जगाच्या प्रमुख नेत्यांना शांतता बहालीसाठी आमंत्रित करण्याच्या निर्णयाच कौतुक केलं. शहबाज यांनी या वर्षी पाकिस्तान आणि अमेरिकेत झालेल्या टॅरिफ करारासाठी राष्ट्रपती ट्रम्प यांचे आभार मानले.
पाकिस्तानने कसलं निमंत्रण दिलं?
बैठकीच्यावेळी शहबाज शरीफ यांच्यासोबत पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख असीम मुनीर सुद्धा होता. पंतप्रधान शरीफ यांनी अमेरिकी कंपन्यांना पाकिस्तानात कृषी, आयटी, खाण, खनिज आणि एनर्जी सेक्टरमध्ये इन्वेस्टमेंटसाठी आमंत्रित केलं. दोन्ही नेत्यांनी क्षेत्रीय सहकार्य आणि दहशतवादविरोधी सहकार्यावर चर्चा केली.
भारताला दिला झटका
अमेरिकेने मागच्या महिन्यात भारतीय सामनाच्या आयातीवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा थेट परिणाम हा भारतीय औषध निर्माण कंपन्यांवर होणार आहे.