‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस!

| Updated on: Jun 15, 2021 | 12:46 PM

पाकिस्तानचे अब्दुल मलिक (Abdul Malik) जेव्हा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची (Aeronautical Engineering) पदवी घेण्यासाठी चीनला गेले, तेव्हा त्यांच्या मनात अनेक स्वप्ने होती आणि त्यांना स्वत:कडून खूप आशा-अपेक्षा देखील होत्या.

‘माझं करिअर संपलं, पदवी फेकून देतो..’, चीनमधून शिकून आलेला इंजिनिअर पाकिस्तानात विकतोय कलिंगड ज्यूस!
अब्दुल मलिक
Follow us on

कराची : पाकिस्तानचे अब्दुल मलिक (Abdul Malik) जेव्हा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची (Aeronautical Engineering) पदवी घेण्यासाठी चीनला गेले, तेव्हा त्यांच्या मनात अनेक स्वप्ने होती आणि त्यांना स्वत:कडून खूप आशा-अपेक्षा देखील होत्या. त्यांना काय माहित की, रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पाकिस्तानात परतल्यानंतर शेवटी त्यांना कलिंगडाचा रस विकावा लागेल! पाकिस्तानच्या कराची (Karachi) येथील रहिवासी अब्दुल मलिक यांनी आपले शालेय शिक्षण संयुक्त अरब अमिरातीमधून पूर्ण केले आहे (Pakistani resident study aeronautical Engineering in china now selling watermelon juice on the road).

नंतर अब्दुलने एयरोनॉटिकल अभियांत्रिकी शाखेत पदवी घेण्यासाठी चीनी विद्यापीठात प्रवेश घेतला. शिक्षण संपल्यानंतर जेव्हा ते पुन्हा पाकिस्तानात परत आले, तेव्हा त्यांना पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स कामरा येथे इंटर्नशिप करण्याची संधी देखील मिळाली. यानंतर त्यांनी पेशावर येथील फ्लाईंग क्लबमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून देखील काम केले.

विमान वाहतुकीशी संबंधित प्रत्येक कंपनीमध्ये केला अर्ज!

त्यांनी काही वर्षे एका खासगी कंपनीत सहाय्यक रॅम्प अधिकारी म्हणून काम केले. परंतु, त्यांची योग्यता व अनुभव असूनही त्यांना ना योग्य पद मिळाले आणि ना योग्य पगार. पाकिस्तानी माध्यम जिओ न्यूजशी बोलताना अब्दुल मलिक म्हणाले की, त्यांनी देशातील सर्व विमानतळांवर अर्ज करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक विमान कंपनीला नोकरी अर्ज पाठवले. पण, त्यांना कोठूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

पाच भाषांमध्ये निपुण अब्दुल

अब्दुल मलिक म्हणाले की, ‘मला वाटते की या अपयशाला सामोरे जावे लागले, कारण माझा रेफर देणारे कोणीच नाहीय.’ अब्दुलला उर्दू, इंग्रजी, चिनी, पश्तो आणि अरबी या पाच भाषा अस्खलीत बोलता आणि लिहिता येतात. कमी पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात असमर्थ असलेल्या अब्दुल मलिक यांच्याकडे आज रस्त्यावर कलिंगडाचा रस विकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. ते म्हणतात की, ‘मी रस विकण्याचा सुरुवात करण्यापूर्वी सहा महिने बेरोजगार होतो आणि घरातच होतो.’

पदवी आणि प्रमाणपत्र फेकून देणार

अब्दुल म्हणाले की, मी जेव्हा ज्यूस विकण्यास सुरुवात केली, तेव्हा मी यशस्वी झालो आणि लोकांना तो ज्यूस खूप आवडला. निराश अब्दुल म्हणतात की, ;मला वाटतं की माझं करिअर आणि भविष्यकाळ दोन्ही आता संपलं आहे.’ आपली निराशा व्यक्त करताना ते म्हणाले की, त्यांची पदवी व प्रमाणपत्रे या सगळ्या निमित्ताने निरुपयोगी सिद्ध झाल्यामुळे ते आता ही प्रमाणपत्र फेकून देणार आहेत.

(Pakistani resident study aeronautical Engineering in china now selling watermelon juice on the road)

हेही वाचा :

इस्त्रायलमध्ये नव्या सरकारला मंजुरी, नेत्यान्याहूचं 12 वर्षाच्या राजवटीची अखेर

Kim Jong Un Video | चर्चा तर होणारच! हुकुमशहा किम जोंग उनचे वजन घटले, जगभरात तर्क-वितर्कांना उधाण