
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अमेरिकेत प्रचंड वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील न्यू जर्सी ( Pm Narendra Modi Visit In New Jersey ) येथे राजकीय मेजवाणीसाठी जाणार आहेत. 22 जूनच्या रात्री ही मेजवाणी होणार आहे. ज्याचे यजमान पद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वत: आहेत. तसेच मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा अमेरिकन दौरा खास असणार आहे. कारण या दौऱ्या दरम्यान न्यू जर्सी येथील एका रेस्तरॉंमध्ये मोदींसाठी स्पेशल ‘मोदीजी थाली’ सादर केली जाणार आहे. काय असणार आहे या थाळीत पाहूयात..
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 जूनला अमेरीकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा तसा खास असणार आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन दाम्पत्याने यांनी नरेंद्र मोदी यांना मेजवाणीचे खास निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या नावाने न्यूर्सीच्या एका रेस्टॉरंटमध्ये खास अनिवासीय भारतीयांसाठी ( एनआरआय ) एका स्पेशल थालीचे लाॅंचिंग केले जाणार आहे. मिडीया रिपोर्टनूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पारंपारिक भारतीय जेवण खूप आवडते. त्यात खास करून गुजराथी पदार्थांवर त्यांचे खास प्रेम आहे. यापूर्वी स्पेशल बिहारी डीश बाटी चोखा चाखली होती. तसेच ते मोसमातील फळे, मशरुम, सरसो का साग, आणि हिरव्या पालेभाज्या अत्यंत आवडीने खातात.
न्यू जर्सी येथील रेस्टॉरंटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी मोदीजी थाली लॉंच करण्याची जय्यद तयारी सुरू आहे. मोदीजी थाली मध्ये भारतीय पंक्वानांचा समावेश असून त्यात मोदी यांची आवडती डीश खिचडी देखील सादर केली जाणार आहे. याशिवाय सरसों का साग, रसगुल्ला, दम आलू पासून ते कश्मीरी डीशेस, इडली, ढोकळा, छास आणि पापड यांचा समावेश आहे.