पाकिस्तानी पुरुषाकडून रोजच्या शारीरिक वेदना, 14 वर्षांची गुलामी, 5 मुलं अन्…, कशी झाली फ्रेंच महिलेची सुटका?

फ्रेंच महिला पाकिस्तानात येताच अत्याचार सुरु, पाकिस्तानी पुरुषाकडून रोजच्या शारीरिक वेदना, 14 वर्षांची गुलामी, 5 मुलं अन्..., कशी झाली महिला आणि मुलांची सुटका? या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे... जाणून घ्या आता कशी आहे फ्रेंच महिला आणि तिच्या मुलांची अवस्था...

पाकिस्तानी पुरुषाकडून रोजच्या शारीरिक वेदना, 14 वर्षांची गुलामी, 5 मुलं अन्..., कशी झाली फ्रेंच महिलेची सुटका?
| Updated on: Jun 28, 2026 | 10:17 AM

बॉलिवूडमध्ये 2025 मध्ये एक सिनेमा प्रदर्शित झालेला, ज्यामध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीचं लग्न भारतीय महिलेसोबत होतं. पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रेमात असलेली महिला पकिस्तानात पोहोचते आणि कधी कल्पना देखील केली नसेल, असं आयुष्य जगते. असंच काही एक फ्रेंच महिलेसोबत देखील झालं आहे. 14 वर्षांचा वनवास भोगल्यानंतर अखेर महिलेची आणि तिच्या 5 मुलांची सुटका झाली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील ‘बारा’ भागातून एका फ्रेंच महिलेची सुटका करण्यात आली आहे. तिच्यासोबत तिची पाच मुलेही होती; ही मुले गेल्या 14 वर्षांपासून घाणेरड्या खोलीत राहत होती.

14 वर्षांपासून कैद आणि अत्याचार केल्याच्या आरोपांखाली अखेर पाकिस्तानी नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. 18 जून रोजी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत 54 वर्षीय फ्रेंच महिला आणि तिच्या 5 मुलांची सुटका करण्यात आली आहे. असं देखील सांगण्यात येत आहे की, गेल्या 14 वर्षांनंतर महिला आणि तिच्या पाच मुलांनी मोकळ्या हवेत श्वास घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मोठा मुलगा गुपचूप घराच्या बाहेर पडला आणि थेट पोलीस स्थानकात पोहोचला, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितलं की, महिला आणि तिची 5 मुलं एका घाणेरड्या खोलीत गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. त्यांच्या शारीरावर जखमा देखील आहेत. तर फ्रेंच महिला सिल्वी यास्मीना हिने पोलिसांना सांगितल्यानुसार, 2003 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे तिचं लग्न पाकिस्तानी व्यक्तीसोबत झालं.

त्यानंतर 2014 मध्ये सिल्वी पाकिस्तानात आली आणि तेव्हापासून तिच्या आयुष्यातील वाईट काळ सुरु झाला. पाकिस्तानात पोहोतचाच नवऱ्याची वागणूक पूर्णपणे बदलली. सिल्वी म्हणते, ‘आमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आलं. नवऱ्याने कधीच नवऱ्याचं आणि बापाचं कर्तव्य पार पाडलं नाही. रोज आम्हाला मारायचा आणि आमचं आयुष्य पूर्ण पणे उद्ध्वस्त केलं… माझं तर भविष्य पूर्णपणे खराब झालं आहे. पण मला माझ्या मुलांचं भविष्य धोक्यात आणायचं नाही. आमच्या शरीरावर जखमा आहेत.’, असं महिला म्हणाली.

दरम्यान, सुटकेनंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने फ्रेंच दूतावासाला याबद्दल माहिती दिली आहे. सिल्व्ही यास्मिन आणि तिची मुले लवकरात लवकर फ्रान्सला परतण्यास इच्छुक आहेत. त्या महिलेच्या तक्रारीवरून पाकिस्तानी पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. ती महिला आणि मुले सुरक्षितपणे त्यांच्या देशात परततील याची खात्री करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि फ्रेंच दूतावास आता या प्रकरणी वेगाने पावले उचलत आहेत. ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनली आहे. तर दुसरीकडे फ्रेंच अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सरकारकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Follow Us