पॉर्न स्टारला गप्प राहण्यासाठी दिले करोडो रुपये, 7 वर्षांनी उघडली केस

| Updated on: Mar 19, 2023 | 11:25 AM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि वाद कायम सुरु असतो. ते राष्ट्रध्यक्ष असताना त्यांचा कार्यकाळ वादामुळे जास्त गाजला. आता ते पुन्हा अडचणीत आले आहे. एका पॉर्न स्टारशी संबंध ठेवल्याच्या प्रकरणात त्यांच्यांवर अटकेची टांगती तलवार आहे.

पॉर्न स्टारला गप्प राहण्यासाठी दिले करोडो रुपये, 7 वर्षांनी उघडली केस
Follow us on

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत आले आहे. एका पॉर्न स्टारशी संबंध ठेवल्याच्या प्रकरणात त्यांच्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. येत्या २१ मार्च रोजी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांनी सोशल मीडियावर एका पोस्ट लिहून अटकेची भीती व्यक्त केली आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स (Stormy Daniels) हिच्याशी डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांचे अफेअर होते. तिच्याशी यौन संबंध ठेवल्याचा हा प्रकार आहे. या बदल्यात तिला 130,000 डॉलर देण्यात आले होते. या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले तर, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच माजी राष्ट्राध्यक्षांवर कोणत्याही प्रकरणात आरोप लावला जाईल.

ट्रम्प यांनी स्वत: केला दावा

हे सुद्धा वाचा

ट्रम्प यांनी शनिवारी पहाटे त्यांच्या सोशल नेटवर्क ट्रूथवर एका पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात मंगळवारी (२१ मार्च) मला अटक करण्याचा हालाचाली सुरु आहे. माझ्या नेटवर्ककडूनही माहिती मला मिळाली आहे.

काय आहे प्रकरण

न्यूयॉर्कची ग्रँड ज्युरी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला 2016 च्या $13 दशलक्ष पेमेंटमध्ये ट्रम्प यांच्या सहभागाची चौकशी करत आहे. रिपब्लिकन नेते ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित लैंगिक संबंधांबाबत डॅनियल्स बोलू नये, यासाठी तिला पैसे देण्यात आले होते. ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी ही रक्कम डॅनियल्स हिला दिली होती. कोहेनने दावा केला की या सेटलमेंटबदल्यात त्यांना ट्रम्प ऑर्गनायझेशनने त्यांना $42 दशलक्ष नुकसानभरपाई आणि अतिरिक्त बोनस दिले.

न्यूयॉर्कमध्ये सुरक्षेची तयारी 
ट्रम्प यांच्यावर आरोप व त्यांना अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ट्रम्प यांच्यांवर कारवाईसंदर्भातील निर्णय ज्युरीकडून कधीही येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना अटक होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात पहिला महाभियोग प्रस्ताव 2019 मध्ये आणला गेला होता. सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये रिपब्लिकचे बहुमत असल्यामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही आणि डोनाल्ड ट्रम्प वाचले होते.