
कधी कधी माणसाची जीवनाची लढाई बाहेरुन दिसते त्यापेक्षा ही लढाई त्याच्या मनात सुरु असते. मनातच्या आत जे वादळ सुरु असते त्यामुळे माणूस कोणाचा आणि कसलाही विचार न करता अनेकदा निर्णय घेतले जातात मग स्वत:चे कितीही नुकसान होवो याचा मनुष्य विचारच करत नाही. असाच प्रकार इंग्लंडमधील ३२ वर्षी जेड डॅमरेल हिच्या बाबत घडला आहे. पेशाने मार्केटिंग ग्रॅज्युएट आणि स्काय ड्रायव्हींगचा छंद असलेल्या जेड हीने विमानातून उडी मारली. पण ना हॅल्मेट घातले ना बॅकअप, ना पॅराशुट उघडले थेट १५,५०० फूटावरुन उडी मारली आणि जमीनीवर धाराशाही झाली. हा कोणताही अपघात नव्हता. तिने स्वत:ला संपवल्याचे उघड झाले.
जेड हिचा ब्रेकअप त्याच रात्री झाला होता. ज्या दिवशी तिने विमानातून उडी मारली. तिचा बॉयफ्रेंड बेन गुडफेलो याच्याशी वेगळे होत तिने कागदावर शेवटची चिट्टी लिहीली ती देखील तिच्या कुटुंबाला लिहीली. सकाळी ८.३० वाजता नाश्ता केला. जसे सर्वकाही सुरळीत सुरु आहे. परंतू सकाळी १० वाजता आकाशातुन उडी मारताना तिने ठरवले की आता परतायचं नाहीच.
जेड काही नवखी नव्हती. तिने आकाशातून ४०० हून अधिक वेळा डायव्हींग केली आहे. परंतू त्या दिवशी तिने जाणून बुजून पॅराशुट उघडले नाही. न बॅकअप एक्टीव्ह केले. ना हेल्मेट घातले. सर्वकाही स्पष्ट होते की तिला जीवंत राहायचं नव्हते.
तिच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंब कोसळले आहे. कुटुंबियांनी दिलेल्या जबाबात सांगितले की जेड खूप बहादूर, सुंदर आणि वेगळ्या प्रकारची व्यक्ती होती. तिने स्काय डायव्हींगमध्ये तिचे स्वातंत्र्य आणि आवड सिद्ध केली. तिचा वावर आणि प्रेम कधीच संपणार नाही. काही तारे इतके चमकतात की लवकर विझतात.परंतू त्यांचा प्रकाश कायम रहातो.