
अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. या काळात अनेक देश भारताच्या मदतीला धावून आले, त्यापैकी चीन एक आहे. मागील काही वर्षात भारत आणि चीनची संबंध तेवढी चांगली राहिली नव्हती. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्याचा विरोध चीनकडून करण्यात आला फक्त विरोधच नाही तर त्यांनी यादरम्यानच्या काळात काही महत्वाचे करार भारतासोबत केली. भारत आणि चीनची वाढती जवळीकता ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल.
अमेरिकेकडून चीनवर टॅरिफ लावला नाहीये. भारत आणि चीनमध्ये व्यापार संबंध सुधारताना दिसत आहेत. भारताकडून चीनमध्ये आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या चार महिन्यात 20 टक्के एक्सपोर्टमध्ये वाढ झाली आहे. 5.76 अरब डॉलरवरून थेट 50,227 करोडपर्यंत पोहोचले आहे. हा अत्यंत मोठा आकडा आहे. एप्रिल महिन्याच भारताने चीनला 1.39 अरब डॉलर एक्सपोर्ट केले जे मागच्या वर्षी 1.25 अरब डॉलर होते. जूनमध्ये हा आकडा 17 टक्के वाढला.
या आकड्यांवरून हे स्पष्ट होताना दिसत आहे की, भारत आणि चीनमधील व्यापार संबंध वाढत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये हा आकडा अजून वाढण्याची दाट शक्यता आहे. मागील काही वर्षापासून हा आकडा कमी होत होता. आता दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांना चांगले दिवस येताना स्पष्टपणे दिसत आहेत. रिपोर्टनुसार, एप्रिल ते जून 2025 दरम्यान एनर्जी, शेतीचे बेस्ट प्रोडक्ट, भारताकडून एक्सपोर्ट अधिक केली गेली. पेट्रोलियम प्रोडक्टचे एक्सपोर्ट जवळपास दुप्पट झाल्याचे बघायला मिळतंय. 883 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे.
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताकडून इतर मार्ग शोधली जात आहेत. हेच नाही तर इतर देशांसोबत भारत व्यापार वाढवत आहेत. सध्या अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये 50 टक्क्यांपेक्षाही अधिक टॅरिफ आकारला जाऊ शकतो, अशा धमक्या अमेरिकेकडून दिल्या जात आहेत. यादरम्यान चीन, रशियासोबत काही महत्वाचे करार भारताकडून करण्यात आली आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर देखील जाणार आहेत.