Rishi Sunak : काय सांगता? यूकेचे नवे पीएम ऋषी सुनक पाकिस्तानी वंशाचे आहेत?

| Updated on: Oct 26, 2022 | 5:37 PM

ऋषी सुनक युकेचे नवे पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानं सोशल मीडियात चर्चांना उधाण

Rishi Sunak : काय सांगता? यूकेचे नवे पीएम ऋषी सुनक पाकिस्तानी वंशाचे आहेत?
सोशल मीडियात रंगलाय वाद
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक (UK new PM Rishi Sunak) विराजमान झाले. त्यानंतर इंटरनेटवर त्यांच्या नावासोबत ते नेमके कुठले आहेत, याचा शोध घेण्यासाठी अनेकजण तुटून पडले आहेत. काहींनी त्यांनी मूळचे भारतीय (India) वंशाचे असल्याचं म्हटलंय. तर काही जण आता त्यांचा मूळ वंश हा पाकिस्तानचा (Pakistan) असल्याचा दावा करत आहेत. यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ब्रिटनचे पहिले हिंदू पीएम बनलेल्या ऋषी सुनक यांनी मारलेली मजल ऐतिहासिक मानली जाते आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचं मूळ शोधण्याचा प्रयत्न अनेकांकडून होताना पाहायला मिळतंय.

ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच पाकिस्तानमधूनही ऋषी सुनक यांच्यावर कौतुकाचा वर्षावर होतो आहे.

हे सुद्धा वाचा

1947 साली पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झाला. त्यावेळी भारताचा भाग असलेल्या गुजरावाला या भागात ऋषी सुनक यांचं मूळ कुटुंब होतं, असं आजतकने म्हटलंय. दरम्यान, विभागणी झाल्यानं गुजरावाला हा भाग नंतर पाकिस्तान या देशात गेला. सध्या गुजरावाला हे पाकिस्तानमध्येच मोडतं.

गुजरावाल पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधील एक शहर आहे. या शहराशी ऋषी सुनक यांचं नातं असल्याचं सांगून ऋषी सुनक हे मूळचे पाकिस्तानी वंशाचे आहेत, असा दावा काहींकडून केला जातो आहे. तसे ट्वीटही समोर आलेत.

प्रसिद्ध लेखक तारेख फतेह यांनी ऋषी सुनक यांच्याबाबत एक खास माहिती शेअर केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलंय की, ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरावाला शहरात राहायला होते. महाराजा रंजीत सिंह यांच्या जन्मस्थान म्हणून ओळख असलेलं गुजरावाला हे शहर जगभरात प्रसिद्ध आहे.

ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा गुजरावाला शहरात राहिले. हा प्रांत सध्या पाकिस्तानमध्ये मोडतो, असंही सांगितलं जातं. दरम्यान, साल 1930 मध्येच ऋषी सुनक यांचे आजी-आजीबो केनियामध्ये गेले, असाही दावा महीदा अफजल नावाच्या एका पाकिस्तानी युजरने ट्वीटरवर केलाय.

दरम्यान, ज्यावेळी ऋषी सुनक यांच्या आजी-आजोबांनी गुजरावाला हे शहर सोडलं, त्यावेळी त्यांनी पाकिस्तान भारताचाच भाग होता. त्यामुळे ते मूळ भारतीय वंशाचेच झाले, असाही युक्तिवाद काहींनी सोशल मीडियावर केला आहे.

ऋषी सुनक हे नेहमीच भारताबाहेर राहिले. पण त्यांनी नेहमीच परकीय संस्कृतीच आदर केला असल्याचं पाहायला मिळालंय. 2017 साली ते तत्कालीन पीएम थेरेसा मे यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर होते. ते ब्रिटीश नागरीक असले, तरी त्यांचा धर्म हिंदू आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 2020 मध्ये ऋषी सुनक जेव्हा अर्थमंत्री बनले होते, तेव्हा त्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती.