AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्दी असो की मधुमेह… Amazon चा AI हेल्थ एक्सपर्ट देईल प्रत्येक प्रश्नाचं झटक्यात उत्तर

ॲमेझॉनने आता आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकत एक नवीन AI हेल्थ असिस्टंट सुरू केला आहे. हा असिस्टंट 30 हून अधिक आजारांवर घरबसल्या प्राथमिक माहिती आणि जलद मार्गदर्शन देतो. वैद्यकीय अहवाल समजून घेणे, डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि लक्षणांवर उत्तरे मिळवण्यासाठी हे साधन मोफत उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान आरोग्य सेवा अधिक सोपी आणि सर्वांसाठी सुलभ बनवेल.

सर्दी असो की मधुमेह... Amazon चा AI हेल्थ एक्सपर्ट देईल प्रत्येक प्रश्नाचं झटक्यात उत्तर
| Updated on: Mar 12, 2026 | 1:32 PM
Share

जगभरात वेगाने पसरत असलेल्या एआय तंत्रज्ञानाने आता आरोग्य क्षेत्रातही मोठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. ऑनलाइन शॉपिंगसाठी ओळखली जाणारी Amazon कंपनी आता हेल्थकेअरमध्येही नवे प्रयोग करत आहे. कंपनीने आपल्या वेबसाइट आणि अ‍ॅपमध्ये हेल्थकेअर AI असिस्टंट सुरू केला आहे, जो 30 पेक्षा जास्त आजारांबाबत प्राथमिक माहिती आणि मार्गदर्शन देऊ शकणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार हा AI असिस्टंट वापरकर्त्यांना वैद्यकीय रिपोर्ट समजावून सांगू शकतो, डॉक्टर किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडर्सशी कनेक्ट होण्यास मदत करू शकतो आणि औषधे तसेच लक्षणांबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आलेले हे मॉडेल सुरुवातीला Amazon One Medical च्या सदस्यांसाठी उपलब्ध असेल.

AI हेल्थ टूल सर्वांसाठी मोफत उपलब्ध

मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे हा फ्री AI असिस्टंट वापरण्यासाठी प्राइम मेंबरशिप किंवा कोणतीही प्रीमियम सेवा घेणे आवश्यक नाही. त्यामुळे सर्वसामान्य युजर्सही या हेल्थ टूलचा सहज वापर करू शकतील. अँड्र्यू डायमंड यांच्या सांगण्यानुसार, हेल्थकेअरमधील अनेक वेळखाऊ आणि माहितीशी संबंधित कामे AI हाताळू शकते. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही खरोखर महत्त्वाच्या उपचारांवर आणि संवादावर अधिक वेळ देता येईल. या उपक्रमामागचा मुख्य उद्देश म्हणजे आरोग्यसेवा अधिक सोपी, जलद आणि सर्वांसाठी उपलब्ध करणे. AI च्या मदतीने भविष्यात रुग्णांना घरबसल्या अनेक वैद्यकीय शंका दूर करण्याची सुविधा मिळू शकते.

या आजारांबाबत सल्ला देऊ शकते

AI असिस्टंट अनेक नॉन-इमर्जन्सी आजारांबाबत मार्गदर्शन देऊ शकतो. यात मुरुम, डोक्यातील उवा यांसारख्या सामान्य समस्यांपासून ते डायबिटीज आणि झोप नीट लागत नाही सारख्या दीर्घकालीन आजारांपर्यंत विविध स्थितींमध्ये मदत केली जाऊ शकते. हा AI एजंट लक्षणे कशी नियंत्रित करायची, प्राथमिक वर्च्युअल असेसमेंट कसे करायचे आणि पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन देऊ शकतो. मात्र यासाठी युजर्सना AI असिस्टंटला आपला वैद्यकीय डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागते. या डेटामध्ये लॅब रिपोर्ट्स, वैद्यकीय रेकॉर्ड आणि क्लिनिकल नोट्स यांचा समावेश असू शकतो.

जर रुग्णाची स्थिती गंभीर असेल तर काय होते?

कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की हा असिस्टंट स्वतः उपचार योजना तयार करत नाही. जर रुग्णाची स्थिती गंभीर वाटली किंवा प्रत्यक्ष उपचाराची गरज भासली, तर AI त्यांना संबंधित हेल्थकेअर प्रोव्हायडरशी जोडतो. तसेच एक महत्त्वाची बाब म्हणजे Amazon One Medical चे सदस्य नसलेल्या किंवा Amazon च्या प्राइमद्वारे दिल्या जाणाऱ्या इंट्रोडक्टरी ऑफरचा फायदा न घेणाऱ्या वापरकर्त्यांकडून सुमारे 29 डॉलर आकारली जाऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.