
सध्या संपूर्ण जगाच्या नजरा अफगाणिस्तानवर आहेत. तालिबानी राजवट परत येताच लोकांनी देश सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या काबूल विमानतळाची स्थिती अत्यंत वाईट आहे. इथं खूप गर्दी होत आहे. अनेक उड्डाणं निलंबित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर विमानतळावर झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यूही झाला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये हे दिसत आहे की काबुलमधून लोकांना निघण्याची कशी घाई लागली आहे. मोठ्या संख्येनं लोक विमानात चढताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अफगाणांच्या गर्दीमुळे परिस्थिती इतकी बिकट झाली की, जमावाला पांगवण्यासाठी, विमानतळाची काळजी घेत असलेल्या अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला.

मात्र, हे लोक गोळी लागल्याने मरण पावले की चेंगराचेंगरीत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेनं काबुल विमानतळावर नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी 6,000 सैनिक तैनात केले आहेत. जमिनीच्या सीमा बंद झाल्यानंतर विमानतळावर लोकांची गर्दी जमली आहे. त्याला कोणत्याही प्रकारे देश सोडायचा आहे.

युनायटेड एअरलाइन्स, ब्रिटीश एअरवेज आणि व्हर्जिन अटलांटिक सारख्या प्रमुख विमान कंपन्या म्हणतात की ते अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र टाळण्यासाठी पुन्हा उड्डाणे करत आहेत. एक दिवस अगोदर तालिबान्यांनी राजधानी काबूल वर पोहोचताच संपूर्ण देश काबीज केला होता. तालिबान काबुलमध्ये येताच, सरकारने गुडघे टेकले आणि शांततेने सत्ता हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली.

ही बातमी आल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळून गेले. यापूर्वी ते ताजिकिस्तानला गेल्याची बातमी आली होती. पण आता कळलं की अशरफ घनी ओमानमध्ये आहेत. यापूर्वी ते खाजगी विमानानं ताजिकिस्तानला गेले होते, पण त्यांच्या विमानाला तेथे उतरण्याची परवानगी नव्हती, त्यानंतर ते ओमानला रवाना झाले. घनी येथून अमेरिकेत जाऊ शकतात अशी चर्चा आहे.

काबूलमधील परिस्थितीनंतर भारताने सुरू केला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा