AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia-Taliban : पाकिस्तानसाठी वाईट बातमी, रशिया तालिबानला कुठली शस्त्र देणार ते सर्व समोर आलं, भारताचा काहीही न करता फायदा

Russai-Taliban Deal : रशिया आणि तालिबानमध्ये नुकताच एक लष्करी करार झाला आहे. हा करार नेमका काय आहे? तालिबानला रशियाकडून काय मिळणार ते समोर आलं आहे. पाकिस्तानचे नक्कीच धाबे दणाणतील. कारण या करारामुळे तालिबानची स्थिती बळकट होणार आहे.

Russia-Taliban : पाकिस्तानसाठी वाईट बातमी, रशिया तालिबानला कुठली शस्त्र देणार ते सर्व समोर आलं, भारताचा काहीही न करता फायदा
Russia-Taliban Deal
| Updated on: Jun 03, 2026 | 1:15 PM
Share

मागच्या आठवड्यात अफगाणिस्तान आणि रशियामध्ये लष्करी करार झाला होता. दोन्ही देशांमध्ये नेमका काय करार झाला, ते आता समोर आलं आहे. रशियाचे विशेष दूत जमीर काबुलोव यांच्यानुसार मॉस्को तालिबानला सध्या कुठलही नवीन शस्त्र देणार नाही. पण तालिबानकडे सोवियत काळापासून असलेल्या शस्त्रांची देखभाल, दुरुस्ती करुन देणार आहे. जमीर काबुलोव हे अफगाणिस्तानसाठी नियुक्त करण्यात आलेले रशियाचे विशेष दूत आहेत. शस्त्रांच्या दुरुस्तीमुळे अफगाणिस्तान तालिबानची स्थिती अधिक बळकट होईल. निश्चितच पाकिस्तानसाठी ही चांगली बातमी नाहीय. कारण मागच्या काही महिन्यात दोन्ही देशांमध्ये अनेकदा सशस्त्र सैन्य संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांवर जोरदार हल्ले केले आहेत. अशावेळी तालिबानकडे चांगल्या दर्जाची शस्त्र असतील, तर पाकिस्तानच नुकसान निश्चित आहे. 30 मे रोजी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दोन्ही देशांमध्ये हा करार झाला.

“येणाऱ्या काळात तालिबानला नवीन शस्त्रास्त्र सुद्धा मिळू शकतात. पण सध्या फक्त जुनी शस्त्र वापरात आणण्यासाठी मदत करणार आहोत” असं काबुलोव यांनी पत्रकारांना सांगितल्याचं अफगाणिस्तान इंटरनॅशनलने वृत्त दिलं आहे. 1990 च्या आधी अफगाणिस्तानात तालिबान आणि रशियामध्ये लढाई झालेली. 1979 साली तालिबानने तत्कालिन सरकार आणि रशिया विरुद्ध लढाई सुरु केली. 1989 साली रशियाने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालिन अफगाणिस्तान सरकारकडे असलेली रशियन शस्त्र नंतर तालिबानच्या ताब्यात गेली.2001 साली अमेरिकेने तालिबानवर हल्ला केला. रशियाशी लढताना अमेरिकेने तालिबानला अनेक शस्त्र दिली. सोवियत काळातील शस्त्र सुद्ध त्यांच्याकडे उरली आहेत. 2021 साली अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर पुन्हा ती शस्त्र तालिबानला मिळाली.

तालिबानकडे सध्या कुठली शस्त्र आहेत?

अफगाणिस्तानकडे सध्या अनेक T-55 आणि T-62 रणगाडे आहेत. BMP-1 आणि BMP-2 चिलखती वाहनं (APC/IFV) तसच Mi-17 आणि Mi-24 हेलिकॉप्टर आहेत. तालिबानकडे मोठ्या प्रमाणात PKM मशीन गन्स सुद्धा आहेत अशी माहिती जमीर काबुलोव यांनी दिली. रणगाड्यांशिवाय तालिबानकडे सोवियत काळातील तोफा, खांद्यावरुन डागता येणारी मिसाइल्स आणि जुनी एअर डिफेन्स सिस्टिमही आहे. देखभाल आणि दुरुस्ती अभावी ही शस्त्र सध्या वापरण्यायोग्य स्थितीमध्ये नाहीत.

तालिबान आपली संरक्षण क्षमता मजबूत करण्यावर भर देत आहे. रशियावरुन परतल्यानंतर काबूलमध्ये पत्रकारांशी बोलताना तालिबानचे संरक्षण मंत्री म्हणाले की, “कुठल्याही देशाने अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची हिम्मत करु नये अशी व्यवस्था आम्हाला बनवायची आहे”

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात