रशियाच्या युक्रेनवर मोठा हल्ला, भूकंपाचे 13 धक्के अन् 10 स्फोट…राजधानी क्यीववर कोणते क्षेपणास्त्र डागले

क्यीववर प्रथमच रशियाकडून इतका मोठा हल्ला करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या पद्धतीचा हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर क्यीवमध्ये आगीचे प्रचंड लोळ दिसत आहे.

रशियाच्या युक्रेनवर मोठा हल्ला, भूकंपाचे 13 धक्के अन् 10 स्फोट…राजधानी क्यीववर कोणते क्षेपणास्त्र डागले
रशियाकडून यूक्रेनवर हल्ला
| Updated on: Jul 04, 2025 | 12:02 PM

इराण-इस्त्रायल दरम्यान युद्धबंदी झाली आहे. परंतु इस्त्रायल आणि गाझा दरम्यान संघर्ष सुरु आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमधील युद्धही सुरु आहे. युक्रेनला अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रांचा पुरवठा थांबल्यानंतर रशिया आक्रमक झाला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी क्यीववर मोठा हल्ला केला आहे. रशिया प्रत्येक ६ सेकंदांनी क्यीववर एक क्षेपणास्त्र डागले आहे. आतापर्यंत १० हून अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. रशियाच्या या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. क्यीवमध्ये १३ भूकंपाचे झटके जाणवले आहे. तसेच १० स्फोटही झाले आहेत.

क्यीव इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, रशियाकडून युक्रेनवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. हा हल्ला रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चेनंतर करण्यात आला. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात विषारी हवा पसरली. लोकांना श्वास घेणे कठीण होऊ लागले आहे. रशियाने हा हल्ला कोणत्या शस्त्रांचा वापर करुन केला, त्याचे माहिती युक्रेनचे अधिकारी घेत आहेत.

क्यीववर प्रथमच मोठा हल्ला

क्यीववर प्रथमच रशियाकडून इतका मोठा हल्ला करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या पद्धतीचा हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर क्यीवमध्ये आगीचे प्रचंड लोळ दिसत आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आपले दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्याचे सांगितले आहे. शहरात लागलेल्या आगीवर जोपर्यंत नियंत्रण मिळत नाही, तोपर्यंत नागरिकांनी बाहेर पडू नये, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रशिया का झाला आक्रमक?

  1. यूक्रेनविरोधात युद्धात रशियाचे आतापर्यंत दहा लाख सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत एक हजार सैनिक ठार झाले आहेत. यूक्रेनने आतापर्यंत रशियाचे ४२० विमाने आणि ३४० हेलिकॉप्टर पाडले आहेत.
  2. रशियाला यूक्रेनविरोधातील युद्ध दीर्घकाळ सुरु ठेवायचे नाही. आता अमेरिकेने यूक्रेनची मदत करणे नाकारले आहे. त्यामुळे रशिया ही बाब संधी म्हणून पाहत आहे.