
रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरूच आहे. युद्ध सुरू होऊन 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेन मदतीसाठी नाटोचे सदस्य असलेल्या देशांकडे मोठ्या आशेने पाहात आहे. मात्र रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आम्ही नाटोचे सदस्य असलेल्या प्रत्येक देशाचे रक्षण करण्यास बांधिल आहोत. आम्ही नाटो देशांचे संरक्षण करू, मात्र या युद्धात आम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. नाटोचे सदस्य असलेल्या देशांनी जर या युद्धात सहभाग घेतला तर तिसरे महायुद्ध अटळ आहे. ज्यामुळे जगाचे प्रचंड नुकसान होऊ शकते. आपल्याला तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करयाचे आहेत. त्यामुळे अमेरिका युद्धात सहभागी होणार नसल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.
We will defend every inch of NATO territory with the full might of a united and galvanized NATO. But we will not fight a war against Russia in Ukraine. A direct confrontation between NATO and Russia is World War III, something we must strive to prevent: US President Joe Biden pic.twitter.com/Molel7B89o
— ANI (@ANI) March 11, 2022
मशिदीवर हल्ला होण्यापूर्वी, तुर्कीमधील युक्रेनच्या दूतावासाने माहिती दिली होती की, मारियुपोलमध्ये अडकलेल्या 34 मुलांसह 86 तुर्की नागरिकांचा एक गट रशियाच्या सततच्या हल्ल्यातून बचाव करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मशिदीत अडकलेल्यांमध्ये तुर्की लोकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
यूएस काँग्रेसने युद्धग्रस्त युक्रेन आणि त्याच्या युरोपियन मित्र राष्ट्रांना 13.6 अब्ज डॉलरची लष्करी आणि आपत्कालीन मदत मंजूर केली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर वीस लाखांहून अधिक लोकांना देश सोडून पलायन करावे लागले आहे. सिनेटने गुरुवारी उशिरा एकूण 1.5 ट्रिलियन यूएस डॉलर्सच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
रशिया राजधानी कीववर सातत्याने बॉम्बफेक करत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युद्धात आतापर्यंत 79 मुलांचा मृत्यू झाला आहे.
कीवच्या वायव्य भागात लढाई सुरू असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियन सैनिक आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे. रशियन सैन्य कीव शहराच्या मध्यवर्ती भागापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर येऊन धडकली आहे.
रशियन सैनिकांचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील औद्योगिक केंद्रावर हल्ला केला असून, या हल्ल्यामध्ये औद्यागिक केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. रशियन सैनिक दिवसाला सरासरी दोनशे बॉम्ब युक्रेनवर टाकत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
रशियाचे युक्रेवर हल्ले सुरूच आहेत. रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रशियाकडून आज करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या अन्न साठववणूक गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
स्थानिक माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच असून, आज देखील रशियाने युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अर्लट करण्यासाठी युक्रेनच्या शहरांमध्ये युद्धाचे सायरन वाजवले जात आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान युक्रेनच्या लुहान्स्क ओब्लास्ट प्रांताचा सत्तर टक्के भाग रशियाच्या ताब्यात गेल्याचा दावा येथील गव्हर्नरकडून करण्यात आला आहे.
Russia controls 70% of Luhansk Oblast, reports AFP News Agency quoting Luhansk Oblast Governor Serhiy Haidai
— ANI (@ANI) March 11, 2022
ड्यूश बँक लवकरच आपला व्यवसाय रशियामधून गुंडाळणार असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.
Deutsche Bank to wind down Russia business: Reuters pic.twitter.com/fBqDQgeK0d
— ANI (@ANI) March 12, 2022
आम्ही युक्रेनसोबत आहोत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहेत. आम्ही रशियाचा निषेध करतो तसेच रशियावर घालण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची आर्थिक कोंडी होईल अशी अपेक्षा असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले आहे.