Russia Ukraine War: तो किराणा आणण्यासाठी बाहेर पडला अन्..यूक्रेनमध्ये नवीनचा मृत्यू कसा झाला? परराष्ट्र मंत्रालयानं घटना सांगितली

| Updated on: Mar 01, 2022 | 4:26 PM

रशिया-युक्रेनमधील हे युद्ध आणखी स्फोटक वळणावर आले आहे. कारण यात आता एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death) झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

Russia Ukraine War: तो किराणा आणण्यासाठी बाहेर पडला अन्..यूक्रेनमध्ये नवीनचा मृत्यू कसा झाला? परराष्ट्र मंत्रालयानं घटना सांगितली
रशियाच्या गोळीबारात नवीनचा मृत्यू
Image Credit source: tv9
Follow us on

Russia Ukrain War : सकाळीच भारताने युक्रेनमधील भारतीयांना (Indian Student in Ukraine) अलर्ट दिला होता. रशिया-युक्रेनमधील हे युद्ध आणखी स्फोटक वळणावर आले आहे. कारण यात आता एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student Death) झाल्याची धक्कादायक माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. युक्रेनध्ये सध्या अनेक भारतीय विद्यार्थ्यी अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल (Missile) हल्ले होत आहेत. या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यावर खारकीवमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर भारतीय विद्यार्थ्याचेही धाबे दणाणले आहेत. भारत सरकार यानंतर मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.

कोण आहे शेखरप्पा नवीन आणि काय घडलं?

  1. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
  2. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे.
  3. ही एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता.
  4. किराणा विकत घ्यायला नवीन बाहेर होता आणि त्याच वेळी तिकडे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला आणि त्यात नवीनच मृत्यू झाला.
  5. हा गोळीबार युक्रेनच्या सैन्याचा नव्हता तर हा गोळीबार हा रशियाच्या सैन्याचा होता.
  6. आता त्याचा मृतदेह शवागृह मध्ये आहे, लवकरात लवकर मृतदेह भारतात आणण्याची व्यवस्था करत आहेत.
  7. नवीनच्या मित्रांकडून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.
  8.  ही माहिती नवीनच्या भावाने परराष्ट्र मंत्रालयाला फोन केल्यानंतर देण्यात आली आहे.
  9.  अजूनही अनेक विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकलेले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  10. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी नवीनच्या मृत्यूनंतर मोठ्या दहशतीच्या वातावरणात आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे ट्विट

किराणा आणयला जाणं जीवावर बेतलं

घमासान युद्ध सुरू असताना किराणा आणायला जाणं नवीनच्या जीवावर बेतलं आहे. त्याच्या कुटुंबियांनी टाहो फोडला आहे. तर देशभरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  भारत सरकार यानंतर तातडीने बैठक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आणखी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा अशी याचना सध्या भारतीय विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. रशियाच्या न्युक्लिअर हल्ल्याच्या भीतीने सध्या जग दहशतीखाली आहे. न्युक्लिअर हल्ल्याच्या धमकीने अनेक देशांना धडकी भरली आहे.

Big Breaking : युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

युक्रेनमधून भारतात आलेले विद्यार्थी भावनिक, अनेकांच्या डोळ्यात पाणी; व्हायरल फोटो तुम्ही पाहिले का ?

भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचं फर्मान, रशिया युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता