रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 10 लाख नागरिकांना आली अंधारात राहण्याची वेळ, अण्वस्त्र हल्ल्याचा धोका वाढला?

रशिया-युक्रेन युद्ध आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. रशिया अण्वस्त्रे वापरणार का? ही चिंता आता जगाला भेडसावू लागली आहे.

रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, 10 लाख नागरिकांना आली अंधारात राहण्याची वेळ, अण्वस्त्र हल्ल्याचा धोका वाढला?
रशिया युक्रेन युद्ध
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 22, 2022 | 11:06 PM

कीव्ह, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांच्या सैन्याने युक्रेनवर हल्ला (Attack on Ukraine) सुरूच ठेवला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, शनिवारी मोठ्या हल्ल्यात मॉस्कोमधून 36 रॉकेट डागण्यात आले. तथापि, ते म्हणाले की यापैकी बहुतेकांना हवेतच नष्ट करण्यात आले, परंतु काही क्षेपणास्त्रांनी वीज प्रकल्प आणि जल केंद्रांना लक्ष्य केले. त्यामुळे सुमारे 10 लाख लोकांना अंधारात जगावे लागत आहे.  पुतीन जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करत असल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.

दुसरीकडे, रशियन अधिकाऱ्यांनी खेरसनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या लोकांना सोडण्याचे काम संथगतीने सुरू होते, मात्र युक्रेन येथील नागरिकांना लक्ष्य करू शकते, अशी भीती रशियाला आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी रशिया-युक्रेन युद्धापासून सुरू झालेली लढाई आता धोकादायक टप्प्यावर पोहोचली आहे.

रशिया अण्वस्त्रे वापरणार का?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपलेला दिसत नाही. युक्रेनवर रशियन दिवसागणिक चिघळत चाललेला आहे. रशियाने युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू केली आहे. त्याच वेळी, युक्रेन खंबीरपणे रशियन हल्ल्यांना तोंड देत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनेक मंचांवर युक्रेनवर अण्वस्त्रांच्या वापराकडे लक्ष वेधले होते, त्यानंतर रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता वाढत आहे.

पुतीन यांनी म्हंटलं की, देशाच्या सुरक्षेसाठी घातक पाऊलं उचलावं लागेल.तीन लाख सैनिकांकडून पुतीन कोणतं काम करून घेणार. रशियाच्या चारही बाजूला ते आपलं वर्चस्व ठेऊ इच्छितात. रशीयनं सेनेनं पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या दोन्ही बाजूला आपला कब्जा केलाय. या भागात जनमत चाचणी 23 ते 27 सप्टेंबरला होणार आहे. युक्रेनला करारा जवाब देण्यासाठी यंत्रणा सज्ज केली.

तीन लाख सैनिक राखीव ठेवण्यात आल्यानं नागरिक सजग झालेत. रशियाच्या नागरिकांमध्ये देश सोडण्याचं प्रमाण वाढतंय. 18 ते 65 वर्षांच्या व्यक्तीच्या परदेशी जाण्यावर रोख लावण्यात आलाय. टर्की, आर्मिनियासह इतर देशात जाणारी विमान फूल आहेत. सुरक्षा मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय कुणाचंही तिकीट जारी होणार नाही.