Danish Siddiqui : ‘कोरोना माणसावरील सर्वात मोठं संकट असेल तर पत्रकारांना ते वास्तव दाखवावं लागेल’, पाहा दानिश सिद्दीकी यांचे खास फोटो

| Updated on: Jul 16, 2021 | 4:57 PM

पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराने सन्मानित फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांचा तालिबान्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर जगभरातून त्यांच्या कामाची दखल घेतली जातेय.

1 / 8
Photo Journalist Danish Siddiqui killed brutally

2 / 8
दानिश हे आपल्या सर्वोत्तम फोटोग्राफीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक फोटोंची चर्चा नेहमीच जागतिक स्तरावर होत राहिलीय. जगावर कोरोनाचं संकट असतानाही त्यांनी आपल्या फोटोग्राफीतून या संकटाचं गांभीर्य कोट्यावधी लोकांपर्यंत पोहचवलं.

3 / 8
भारतात कोरोनाने कहर केलेला असताना सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तवात कितीतरी अधिक मृत्यू होत आहेत हे वास्तव दानिश यांच्या फोटोनेच समोर आणलं.

4 / 8
कोरोनाने अनेकांचे जवळचे लोक हिरावले. त्यामुळे अनेकजण भावनिकदृष्ट्या कोसळले. दानिश यांनी या सर्वांचंच दुःख कॅमेऱ्यात टिपलं.

5 / 8
ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या साथीने भविष्याची स्वप्नं पाहिली त्यांना कोरोना काळात आपल्या जन्मदात्यांना मुखाग्नी द्यावा लागला. हे दुःख दानिशच्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसतं.

6 / 8
दानिश यांनी अंगावर काटा आणणारे दिल्लीतील स्माशानभूमीत एकाचवेळी जळणाऱ्या अनेक मृतदेहांचं वास्तव आपल्या कॅमेऱ्यात टिपलं.

7 / 8
दानिश यांच्या फोटोंनी व्यवस्थेला धडका दिल्या. त्यांच्या फोटोंनी प्रशासनाला खडबडून जागं केलं आणि लोकांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी धोरण ठरवून तातडीने निर्णय घ्यायला भागही पाडलं.

8 / 8
सरकारची आरोग्य व्यवस्था आणि इतर सुविधांबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात दानिश यांनी मोठी भूमिका निभावली. त्यांच्या फोटोंनी या विषयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान दिलं.