“आधी गोळ्या झाडल्या, मग फरफटत नेलं आणि गाडीखाली चिरडलं”, पत्रकार दानिश सिद्दीकींच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा
आंतरराष्ट्रीय पातळीवर पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झालाय. तालिबान्यांनी सिद्दीकी यांना फरफटत नेलं आणि त्यांच्या अंगावरुन गाडी घालत निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड झालंय.

काबूल : आंतरराष्ट्रीय पातळीवर पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झालाय. तालिबान्यांनी सिद्दीकी यांना फरफटत नेलं आणि त्यांच्या अंगावरुन गाडी घालत निर्घृणपणे हत्या केल्याचं उघड झालंय. सुरुवातीला अफगाणिस्तानमधील (Afghanistan) सैन्य आणि तालिबानी (Taliban) यांच्या चकमकती सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, आता सिद्दीकी यांच्या मृतदेहाचे फोटो आणि एक्स-रेसोबतच वैद्यकीय अहवालावरुन तालिबानचा छळ समोर आलाय. यावरुन तालिबानने मृत्यूनंतरही सिद्दीकी यांच्या मृतदेहाचं विटंबन केल्याचं दिसतंय.
“हत्येनंतर तालिबान्यांनी मृतदेह फरफटत नेला आणि गाडीखाली चिरडलं”
अफगाणिस्तान आणि भारतीय राष्ट्रीय सुरक्षेतील अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CNN-News18 याबाबत वृत्त दिलंय. यानुसार, दानिश सिद्दीकी यांच्या शरीरात 12 गोळ्या सापडल्यात. शरीरावर गोळी लागलेल्या ठिकाणी जखमा दिसून आल्या. शरीराच्या आतही अनेक गोळ्या निघाल्या. सर्व गोळ्या धड आणि शरीराच्या मधल्या भागात आढळल्या. शरीराला घसरत नेल्याचे निशाण आहेत. हत्येनंतर तालिबान्यांनी मृतदेह फरफटत नेल्याचा संशय आहे. इतकचं नाही तर हत्येनंतर त्यांनी अनेकदा दानिश यांचं डोकं आणि छाती गाडीखाली तुडवले. चेहऱ्यावर आणि छातीवर गाडीच्या टायरचे निशाण असल्याचं समोर आलंय. एसयूव्ही गाडी शरीरावरुन घातल्यानं असं झाल्याचा अंदाज आहे.
“तालिबान्यांना ओरडून पत्रकार असल्याचं सांगूनही हत्या”
कंधारमध्ये तालिबान्यांनी दानिश यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अफगान सैन्याच्या पथकानं आपलं मिशन सुरूच ठेवलं आणि दोन गटात विभागले गेले. एक युनिट दुसऱ्या ठिकाणी केलं आणि दुसरं युनिट दानिश यांना घेऊन स्पिन बोल्डकमधील एका स्थानिक मशिदीत आसरा घ्यायला गेलं. मात्र, तालिबानच्या रेड युनिटने सैन्याचा पाठलाग गेला आणि मशिदीत घुसले. तेथे त्यांनी अफगाण सैनिकांची हत्या केली. यावेळी दानिश सिद्दीकी यांनी तालिबान्यांना ओरडून आपण पत्रकार असल्याचं सांगितलं. आपलं आयडी कार्डही दाखवलं आणि आपण भारतीय पत्रकार असल्याचं सांगितलं. यानंतर तालिबान्यांनी या आयडी कार्डचे फोटो काढून क्वेटामधील आपल्या मुख्यालयात पाठवले आणि पुढील निर्देश मागितले.
“सोशल मीडियावर दानिश यांच्या तालिबान विरोधी पोस्ट पाहून हत्येचे आदेश”
यानंतर तालिबान मुख्यालयाने दानिश यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्ट चेक केल्या. तेथे तालिबान विरोधी पोस्ट पाहून दानिश अफगाण सैन्यासोबत असल्याचं मत बनवलं. यामुळे नाराज तालिबान्यांनी दानिश यांची हत्या करण्याचे आदेश दिले, अशीही माहिती सांगितली जात आहे.
श दिया.