
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आणि त्या अधिसूचनेवर सह्या देखील केल्या. जगभर भारत अमेरिका मित्र असल्याचे सांगणारे डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसले. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करतो आणि त्याबदल्यात रशियाला पैसा देतो, रशिया याच पैशातून युक्रेनच्या विरोधात लढण्यासाठी आणि लोकांचे जीव घेण्यासाठी मशिने खरेदी करत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, याकरिता भारतावर दबाव टाकला जात आहे.
आता नुकताच धक्कादायक अशी माहिती पुढे येताना दिसत आहे. भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे कारण हे रशियाचे तेल खरेदी करणे नसलयाचे पुढे आलंय. अमेरिकन ब्रोकरेज फर्म जेफरीजने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यानंतर जगात खळबळ उडालीये. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, पाकिस्तान आणि भारतात चार दिवस संघर्ष सुरू होता. या युद्धात आपण मध्यस्थी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला. मात्र, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षा होती की, भारत त्यांचा दावा खोटा आहे, असे अजिबात म्हणणार आहे. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षात भारताने कधीही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप स्वीकारलेला नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून परत परत दावा केला जातो की, मी हस्तक्षेप केल्यानेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले होते. हे युद्ध परमाणू हल्ल्यांपर्यंत पोहोचले होते. मी जगातील सर्वात मोठे होणारे युद्ध थांबवले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबाबत केलेला दावा खोटा असल्याचे अनेकदा भारताकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याची संधी निघून गेली. अमेरिकन फर्मच्या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, भारत आणि अमेरिकेत शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही समस्या नाही. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोडून काढल्यानेच भारताबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात राग आहे आणि त्यामुळेच त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला.