दक्षिण अफ्रिकेत पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, जी-20 शिखर परिषदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे मानले आभार

दक्षिण अफ्रिकेत जी-20 शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. दी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि त्यांच्या राजनैतिक कौशल्यांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दक्षिण अफ्रिकेत पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, जी-20 शिखर परिषदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे मानले आभार
दक्षिण अफ्रिकेत पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, जी-20 शिखर परिषदेत दिलेल्या पाठिंब्यामुळे मानले आभार
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Nov 24, 2025 | 11:25 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जी20 शिखर परिषदेसाठी दक्षिण अफ्रिकेत गेले होते. 21 नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये जी20 शिखर परिषदेत त्यांनी सहभाग नोंदवला. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या परिषदेत त्यांनी अनेक राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांशी भेटीगाठी घेतल्या. तसेच द्विपक्षीय बैठका घेत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील केली. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाशी देखील वार्तालाप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वभावाचं दक्षिण अफ्रिकेतील जनतेने प्रचंड कौतुक केलं. तसेच उत्साहही दाखवला. तिथल्या लोकांनी G20 मध्ये दक्षिण आफ्रिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि त्यांच्या राजनैतिक कौशल्यांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

जी20 शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी तीन सत्रांमध्ये भाग घेतला. या सत्रांमध्ये त्यांनी शाश्वत आणि समावेशक विकासावर भर दिला. तसेच जागतिक विकास मॉडेलचा पुनर्विचार करणे, ड्रग्ज-दहशतवाद नेटवर्कशी लढणे आणि आरोग्य संकटांसाठी जागतिक प्रतिसाद पथक तयार करणे असे काही महत्त्वाचे प्रस्ताव देखील मांडले. पंतप्रधान मोदींनी सहा कलमी अजेंडा सादर केला. त्यांनी अनेक देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेतल्या.

पंतप्रधान मोदी, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसा

उलरिच जानसे व्हॅन वुरेन नावाच्या एका युजर्सने ट्विट केले की, “जी20 दरम्यान भारताने दक्षिण आफ्रिका आणि संपूर्ण खंडाला दाखवलेल्या पाठिंब्याने आणि उदारतेने मी खूप प्रभावित झालो आहे. भारताला खूप प्रेम.”

मोलाटेलो राचेकू नावाच्या एका युजर्सने लिहिले की, “पंतप्रधान मोदी हे जी20 शिखर परिषदेचे अधिकृत प्रभावशाली नेते आहेत. ते त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांच्या टाइमलाइनवर सतत सामग्री पोस्ट करत आहेत. हे पाहून मला खरोखर आनंद झाला आहे. ते देशांसोबत करार देखील करत आहेत; ते एका मोहिमेवर आहेत.”

एका युजर्सने लिहिले की, “जेव्हा तुम्ही इथे असता तेव्हा तुम्हाला घरी असल्यासारखे वाटते. भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्या क्रमांकाची भारतीय लोकसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेला तुमचा पाठिंबा म्हणजे भारताला पाठिंबा आहे.”

दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, “मी पंतप्रधान मोदींचा चाहता आहे. आणि तोही खूप. त्यांची ऊर्जा खरोखरच उत्तम आहे.”

जी20 शिखर परिषदेनंतर भारतात परतताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जोहान्सबर्ग जी20 चे यश समृद्ध आणि शाश्वत पृथ्वीला हातभार लावेल. तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील लोकांचे, राष्ट्रपती रामाफोसा यांचे आणि सरकारचे आभार मानले.