
उद्योग, व्यवसाय क्षेत्रात काही कंपन्या आपली अशी ओळख बनवतात की, त्यांच्या नावातच मोठेपणा दडलेला असतो. या कंपन्या आपल्या कामाने अशी छाप उमटवतात की, त्या विस्मृतीत जाण शक्यच नसतं. उदहारण द्यायच झाल्यास भारतातील टाटा उद्योग समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र अँड महिंद्रा, लार्सन एंड टुब्रो, मारुती सुझुकी. आज भारतीय जनमानसावर या कंपन्यांनी आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. या कंपन्यांची जी उत्पादन म्हणजे प्रोडक्ट आहेत, त्याची एक विश्वासहर्ता आहे. या कंपन्यांनी आपल्या मेहनतीने ही ओळख निर्माण केलीय, विश्वास संपादन केला आहे. बोईंग ही सुद्धा अशीच एक कंपनी आहे. एयरोस्पेस सेक्टरमधील बोईंग ही जगातील एक मोठी अमेरिकन कंपनी आहे. बोईंग हे नाव कधीच ऐकलं नाही, अशी फार कमी लोक सापडतील. आज सुनीता विलियम्स यांच्यामुळे भारतात बोईंग कंपनी चर्चेचा विषय ठरलीय. आज बोईंगच्या विश्वासहर्तेबद्दल एक मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालय. कारण बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्ट अवकाश यानाने सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर सोडलं. पण हे स्पेसक्राफ्ट त्यांच्याशिवाय पृथ्वीवर परतलं. हा बोईंग कंपनीच्या...