AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की…

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तरी काही फरक पडणार नाही.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की...
पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया उपांत्य फेरीत, झालं असं की...Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 01, 2026 | 8:05 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या करो या मरोच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे भारताला मोठं टार्गेट उभं करणं गरजेचं होतं. पण भारताचा डाव गडगडला. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे टीम इंडियावरील दडपण वाढलं. मधल्या फळीत वेदांत त्रिवेदीने डाव सावरला. त्याच्या 68 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाला बळ मिळालं. तर आरएस अंब्रिशने 29, कनिष्क चौहाने 35 आणि खिलान पटेलने 21 धावा केल्या. त्यांच्या खेळीमुळे भारताने 252 धावांपर्यंत मजल मारली. खरं तर हे आव्हान पाकिस्तानसाठी जड होतं. कारण हे आव्हान 50 षटकात पूर्ण करून काही फायदा नव्हता. हा सामना जिंकून नाही तर 33.3 षटकात पूर्ण करणं गरजेच होतं. पाकिस्तानला हे काही जमलं नाही. त्यामुळे पाकिस्तानचं सामना संपण्यापूर्वीच उपांत्य फेरीचं गणित बिघडलं.

पाकिस्तानने विजयी धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. हमजा झहूर आणि समीर मिन्हास यांनी 23 धावांची भागीदारी केली. पण समीर मिन्हास अवघ्या 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानवरील दडपण वाढलं. त्यानंतर हमजा झहूर आणि उस्मान खान यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 80 चेंडूत 65 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण ही जोडी फुटला आणि संघाचं टेन्शन दूर झालं. हमजा झहूर 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर उस्मान खान आणि कर्णधार फरहान युसूफ ही जोडी जमली. उस्मान खानने 77 चेंडूत 5 चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. फरहान युसूफ 39 चंडूत 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला अहमद हुसैन काही खास करू शकला नाही. त्याने 6 चेंडूत फक्त 2 धावा केल्या.

पाकिस्तानने 33.3 षटकात 4 गडी गमवून 167 धावा केल्या. खरं तर भारताने विजयासाठी दिलेलं 252 धावांचं आव्हान 33.3 षटकात पूर्ण करायचं होतं. पण पाकिस्तानचा संघ धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना जिंकला तरी काही फरक पडणार नाही. कारण भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. पाकिस्तानपेक्षा भारताचा नेट रनरेट हा चांगला आहे. त्यामुळे आता विजय मिळवला तरी त्यात काही फरक पडणार नाही. भारताचा नेट रनरेट हा +3.337 आहे, तर पाकिस्तानचा नेट रनरेट हा +1.484 इतका आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...