सोनं काढायला गेले अन् जीवच गेला… सोन्याची खाण कोसळून 60 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

सुदानमधील वेस्ट कॉर्डोफोनमधील एका सोन्याच्या खाणीत झालेल्या भीषण दुर्घटनेत 60 मजुरांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. अनसुरक्षित आणि पारंपारिक खाणकाम पद्धतीमुळे हा अपघात घडला. सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने आणि आवश्यक उपकरणांच्या अभावामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. देशातील धोकादायक सोने उत्खननाची ही गंभीर बाजू आहे.

सोनं काढायला गेले अन् जीवच गेला... सोन्याची खाण कोसळून 60 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता
Sudan gold mine collapse
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 5:31 PM

सूडानच्या वेस्ट कॉर्डोफोनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अल-नुहूद शहराच्या उत्तरेतील एका परिसरातील सोन्याची खाण धाडकन कोसळली आहे. या अतिशय भयंकर दुर्घटनेत 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या खाणीत मजूर सोनं काढायला गेले होते. पण दुर्देवी घटना घडल्याने या मजुरांचा जागीच मृत्यू झाला. आफ्रिकेतील सोन्याची निर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत सूडान हा देश सर्वात टॉपला आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या होत्या.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सूडानच्या वेस्ट कॉर्डोफोनमध्ये अल-नुहुद शहरात रविवारी सोन्याची खाण कोसळली. अचानक ही दुर्घटना घडली. या खाणीतून 60 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सूडानमध्ये खतरनाक पारंपारिक पद्धतीने खाणीतून सोनं काढलं जातं. त्यानंतर हे सोनं अवैध पद्धतीने विकलं जातं. या सोन्याची तस्करीही केली जाते. सोनं काढण्याची पारंपारिक पद्धत अत्यंत खतरनाक असते. त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते.

सुरक्षेचा बंदोबस्त नाही

सूडानच्या बहुतेक सोन्याच्या खाणीत सुरक्षा नियमांचं पालन केलं जात नाही. तसेच सुरक्षेची कोणतीही उपाय योजना केली जात नाही. सुरक्षेची कोणतीही उपकरणं या खाणीत नसतात. त्यामुळे या ठिकाणी वारंवार मोठ्या दुर्घटना होतात आणि मृतांची संख्याही वाढत जाते. सूडानमधील अनेक सोन्याच्या खाणी वेस्ट कॉर्डोफोन अर्धसैनिक दल रॅपिड सपोर्ट फोर्सेजच्या नियंत्रणात आहेत. या सोन्याच्या खाणी त्यांच्यासाठी कमाईचं मोठं साधन आहे. पण सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या मजदुरांच्या सुरक्षेबाबत मात्र कोणतंही पाऊल उचललं जात नाहीये.

यापूर्वीही झाल्या दुर्घटना

जुलै 2026मध्ये उत्तर सूडानच्या वादी हाफामध्ये सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना झाली होती. यावेळी 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी एप्रिल 2026मध्ये 7 मजुरांचा मृत्यू झाला होता. तर सहाजण जखणी झाले होते. दरम्यान, या मजुरांना काय मदत केली जाणार आहे? त्याबाबत सूडान सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या दुर्घटना रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या जाणार आहेत? याचीही माहिती देण्यात आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us