AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया-चीनवर हल्ल्याचा मोठा अलर्ट; अमेरिकेने उभारला गुप्त तळ

Kwajalein US Army : रशिया आणि चीनवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेने समुद्रात एक गुप्त तळ उभारला आहे. त्यासाठी अमेरिका भाडे सुद्धा मोजते. जर या दोन्ही पैकी एका देशावर हल्ला करायचा असेल तर येथे सर्वात अगोदर हालचाली वाढतात.

रशिया-चीनवर हल्ल्याचा मोठा अलर्ट; अमेरिकेने उभारला गुप्त तळ
अमेरिकेचे मोठे पाऊल
| Updated on: Sep 26, 2025 | 12:20 PM
Share

अमेरिकेपासून 4000 किलोमीटर, चीनपासून 5000 किलोमीटर आणि रशियापासून जवळपास 5500 किलोमीटरवर एक बेट आहे. या द्वीपावर अमेरिकेचा गुप्त लष्करी तळ आहे. क्वाजालीन आणि एबे हे ते दोन द्वीप आहेत. ही दोन्ही बेटे उणेपूरे 20 किलोमीटर सुद्धा नाही. पण अमेरिकेला सामारिकदृष्ट्या हे बेट महत्त्वाचं आहे. येथील छोटे छोटे बेटे हे लष्करी हालचालीसाठी अमेरिकेला फायदेशीर आहेत. येथून चीन आणि रशियावर लक्ष ठेवण्यात येते. भविष्यात युद्ध भडकले तर येथून मारा करणे अमेरिकेसाठी सहज शक्य आहे.

हे बेट कायम ताब्यात राहावे यासाठी अमेरिका अनेक पट पैसा खर्च करतो. कोट्यवधी रुपये खर्च करते. येथील स्थानिकांना मोठी मदत करण्यात येते. या बेटावर हक्क सांगण्याचा चीनने पण प्रयत्न केला. त्यासाठी मोठी रक्कम खर्च केली. पण चीनची डाळ काही शिजली नाही. सामारिक दृष्ट्या हे बेट अत्यंत महत्त्वाचं असल्याने त्यासाठी अमेरिका वारेमाप खर्च करतो.

प्रशांत महासागरात आहे क्वाजालीन

क्वाजालीन हे बेट, लष्करी तळ, बंदर प्रशांत महासागरात आहे. येथे जवळपास 10 हजार लोक राहतात. क्वाजालीनमध्ये केवळ 16 किलोमीटर परिसर आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिका या जागेचा वापर लष्करी तळासारखा करतो. चीन वा रशियन मिसाईल हल्लाविरोधात येथे सुरक्षा कवच सुद्धा आहे. अमेरिकेच्या सुरक्षा प्रणालीत या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

येथे अमेरिकेच्या अनेक मिसाईलचे परीक्षण करण्यात आले आहे. अमेरिका चीन वा रशियावर हल्ला चढवणार की नाही याची सर्वात अगोदर रंगीत तालीम येथे समजते. हे ठिकाणी आगाऊ इशारा देण्याचे काम करते. क्वाजालीन अमेरिकेचे हायटेक बेस आहे. तर एबे या बेटावर केवळ लोक राहतात. या बेटावरील लोक क्वाजालीन येथे मजूर म्हणून वा इतर कामे करतात. पण त्यांना गुप्त लष्करी तळावरील संवेदनशील भागापासून दूर ठेवण्यात येते.

अमेरिका देते इतके भाडे

क्वाजालीन बेटावर अमेरिकेचे 1300 सैनिक तैनात आहेत. याठिकाणी अत्याधुनिक रडार यंत्रणा, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र आहेत. येथे सैनिकांसाठी खास घरं, सावर्जनिक स्विमिंग पूल, कंट्री क्लब, गोल्फ कोर्स, बॉलिंग एली, रुग्णालय, हॉटेल आणि इतर अनेक सोयी-सुविधा आहेत. या भागाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाते. या बेटासाठी अमेरिका कमीत कमी 26 दशलक्ष वार्षिक भाडे मोजते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...