चीनला युरोपचा झटका; 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफचा फटका; भारताचा नंबर केव्हा?
Europe impose tarrifs on china : ट्रम्प यांच्यानंतर युरोपियन संघ सुद्धा चीनला टॅरिफचा दणका देणार आहे. रशियाशी जवळ असलेल्या चीन आणि भारतावर अमेरिका दात ओढ खावून आहे. आता युरोपियन संघ भारतावर केव्हा आणि किती टॅरिफ लावेल याची चर्चा सुरू झाली आहे.

Tariff on China by EU : युरोपियन संघ (EU) चीनच्या स्टील आणि त्याच्या उत्पादनावर 25 ते 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ आकारणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. जर्मनीतील हँडल्सब्लाट या वृत्तपत्राने एका मोठ्या अधिकाऱ्याच्या आधारे याविषयीचे वृत्त दिले आहे. युरोपियन संघाने त्यावर मत व्यक्त केलेले नाही. युरोपियन आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीलाचा स्टील आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केले होते. पण ही केवळ सबब असल्याचे मानल्या जात आहे. रशियाशी जवळीक असल्यानेच अमेरिकेच्या सांगण्यावरून चीनवर टॅरिफ लादल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर युरोपियन संघाने टॅरिफ लावण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे चीननंतर आता भारतावर युरोपियन संघ केव्हा आणि किती टॅरिफ लावणार याची चर्चा सुरू झाली आहे.
नवीन व्यापारी नियम आणण्याची तयारी
आयोग दीर्घकाळासाठी एक नवीन व्यापारी नियम आणण्याची तयारी करत आहे. ग्लोबल व्यापार नियमातंर्गत EU सध्याच्या स्टील सुरक्षा उपायासंदर्भात वर्ष 2026 च्या मध्यांतरानंतर वाढवू शकत नाही. तर यंदा चीनची स्टील निर्यात उच्चांकावर पोहचली आहे. निर्यातीत चीनने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ही निर्यात 4 टक्क्यांहून 9 टक्के वाढून जवळपास 115 ते 120 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. चीन हा जगातील अर्ध्यांहून अधिक स्टील निर्मिती करतो.
युरोपियन संघाने टॅरिफ लादल्यास चीनला आता नवीन बाजारपेठ शोधावी लागणार आहे. सध्या जगभरात प्रॉपर्टी सेक्टरमध्ये मोठी उलाढाल नाही. वर्ष 2024 मध्ये चीनच्या स्टीलवरोधात 54 टॅरिफ आणि इतर व्यापार प्रतिबंध सुरू झाले. युरोपियन स्टील उत्पादनावर अमेरिकेत 50 टक्के टॅरिफ आहे. त्यातच युरोपने आता चीनवरही टॅरिफ लादण्यात येणार आहे.
स्टील उद्योगांना वाचवण्याची कसरत
जुलै महिन्याच्या अखेरीस EU ने स्टील, ॲल्यूमिनियम आणि तांब्या सारख्या स्क्रॅप मेटलच्या आयात आणि निर्यातीवर निगराणी वाढवली होती. स्क्रॅप मेटल युरोपासाठी महत्त्वाचे मानल्या जाते. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे युरोप समोर मोठे आव्हान आहे. तर दुसरीकडे चीनवर टॅरिफ लादण्यामागे ट्रम्प असल्याचा दावाही करण्यात येत आहे. तर युरोपियन संघ दबावाखाली भारतावर सुद्धा टॅरिफ लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
