अविवाहित मुलींना मारुन त्यांच्या रक्ताने आंघोळ करायची ही राणी..हे सर्व करण्यामागे एकच कारण!

इतिहासात क्रूर महाराजा व महाराण्यांच्या कथांनी भरलेला असला तरी, यांपैकी काही कथा इतक्या भयंकर आहेत की त्यांची कल्पनाही करता येत नाही. अशीच एक कथा म्हणजे 'ब्लड काउंटेस'ची. चला तर मग या कथेतील शेकडो मुलींची हत्या करणाऱ्या या महाराणी विषयी जाणून घेऊयात.

अविवाहित मुलींना मारुन त्यांच्या रक्ताने आंघोळ करायची ही राणी..हे सर्व करण्यामागे एकच कारण!
Representative Image
| Updated on: Aug 18, 2026 | 1:03 PM

इतिहासात अनेक क्रूर शासकांच्या कथा आहेत, ज्यांची क्रुरता वाचल्यावर किंवा ऐकल्यावर आजही आपल्या अंगावर काटा येतो. अशीच एक कथा आहे ती म्हणजे हंगेरीची काउंटेस एलिझाबेथ बाथोरीची. हे नाव आजही भीती आणि रहस्याशी जोडले जाते. इतिहासात या राणीची अशी नोंद आहे जिने आपलं सौंदर्य टिकावं म्हणून तब्बल 650 मुलींची हत्या केलीय. मात्र तिच्या कथांमधील काही भाग इतिहासापेक्षा दंतकथांमध्ये अधिक प्रसिद्ध झाला आहे.

एलिझाबेथ बाथोरीचा जन्म 1560 मध्ये ट्रान्सिल्व्हेनियातील एका श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबात झाला. तिच्या घराण्यात राजकीय ताकद आणि मोठा सामाजिक प्रभाव होता. वयाच्या 15 व्या वर्षी तिचा विवाह काउंट फेरेंक नाडास्डी यांच्याशी झाला. लग्नानंतर ती सेगेथे नावाच्या भव्य किल्ल्यात राहू लागली.

बाथोरी महाराणी तिच्या दासी आणि कामानिमित्त आलेल्या गरीब कुटुंबातील मुलींवर अमानुष अत्याचार करत असल्याचा आरोप होता. एवढेच नाही तर महाराणी किल्ल्यातील काम करणाऱ्या मुलींना छळणे, त्यांना वेदना देणे आणि त्यांची हत्या करणे असे गंभीर आरोप लावण्यात आले. पण या राणीच्या प्रभावशाली कुटुंबामुळे अनेक वर्षे तिच्याविरोधात कोणीही आवाज उठवण्याचे धाडस केले नाही.

1600 च्या दशकाच्या सुरुवातीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या क्रूरतेच्या कथा अधिक चर्चेत आल्या. आरोपांनुसार गरीब घरातील मुलींना किल्ल्यात आणून त्यांच्यावर अत्याचार केले जात असत. काही कथांमध्ये तिच्यावर अत्यंत भयानक कृत्ये केल्याचे सांगितले जाते, मात्र या कथांमधील प्रत्येक गोष्टीला ठोस ऐतिहासिक पुरावा मिळालेला नाहीये.

तिच्या नावाशी जोडली गेलेली सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे तरुण मुलींच्या रक्ताने स्नान करण्याची. दंतकथेनुसार तिने आपलं सौंदर्य तसेच कायम टिकून राहावं म्हणून शेकडो मुलींच्या हत्या केल्या. या मुलींची हत्या करुन त्यांच्या रक्ताने ही राणी अंघोळ करत. विशेष म्हणजे ती केवळ हत्या करत नव्हती तर या मुलींच्या शरीराचे लचके तोडत कातडी काढून विटंबनही करत होती. यात तिला तिच्या नोकरदारांनीही मदत केली. 1590 ते 1610 या काळात या साडे सहाशे हत्या करण्यात आल्या. यामुळेच तिला ‘ब्लड काउंटेस’ म्हणजेच ‘रक्तराणी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र इतिहासकारांच्या मते, रक्ताने स्नान करण्याची कथा नंतरच्या काळात निर्माण झालेली दंतकथा असण्याची शक्यता जास्त आहे.

महाराणीच्या विरोधात मूत्युदंडाची शिक्षा, मात्र अंमलबजावणी नाही

बाथोरीविरुद्धची कारवाई तेव्हा सुरू झाली जेव्हा तिच्यावर प्रतिष्ठित कुटुंबातील मुलींनाही लक्ष्य केल्याचा आरोप झाला. हंगेरीचा राजा मॅथियास याने या प्रकरणात हस्तक्षेप केला. 1611 मध्ये तिच्यावर खटला चालवण्यात आला. तिच्या साथीदारांना शिक्षा झाली, मात्र तिच्या उच्च स्थानामुळे तिला मृत्युदंड देण्यात आला नाही.

तिला सेगेथे किल्ल्यातील एका खोलीत कैद करण्यात आले, जिथे ती जवळपास तीन वर्षे राहिली. त्यानंतर 1614 मध्ये तिचा मृत्यू झाला.

एलिझाबेथ बाथोरीची कथा आजही इतिहासातील सर्वात गूढ आणि चर्चेतील घटनांपैकी एक मानली जाते. तिच्यावरचे आरोप किती खरे आणि किती दंतकथा आहेत, यावर आजही वाद आहेत. मात्र तिचे नाव क्रूरता, सत्ता आणि रहस्य यांचे प्रतीक म्हणून इतिहासात कायम राहिले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us