
Ganpati Photo on currency note : भारतात देवी-देवतांना खूप महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मात सर्वात प्रथम गणपती बाप्पाचीच पूजा केली जाते. सध्या देशात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सगळीकडे गणरायाचं आगमन झाले आहे. जगभरात गणरायाची उपासना करणारे लाखो लोकं आहेत. भारतातच नव्हे तर जगभरात गणपती बाप्पाची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का एका देशात नोटेवर गपणती बाप्पाचा फोटो आहे. खूप कमी लोकांना याबाबत माहिती आहे. कोणता आहे तो देश चला तर मग जाणून घेऊया.
तुम्ही कधी नोटांवर छापलेले गणपती बाप्पाचे चित्र पाहिले आहे का? कदाचित खूप कमी लोकांनी पाहिलं नसेल, पण जगात असा एक देश आहे जिथे नोटांवर गणरायाचं चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे या देशात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. पण असे असतानाही येथे नोटेवर गणेशाचे चित्र आहे.
जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात नोटांवर गणपती छापला जातो. इंडोनेशियन सरकारने 1998 मध्ये ही नोट जारी केली होती. भारतातील चलनाप्रमाणे येथील चलनही प्रचलित आहे. येथील चलनाला रुपिया असे म्हटले जाते. इंडोनेशियातील सुमारे ८७.५ टक्के लोक इस्लामला मानणारे लोकं आहेत. तर फक्त ३ टक्के हिंदू लोकं येथे राहतात. इंडोनेशियामध्ये 20 हजार रुपयांच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे.
इंडोनेशियामध्ये 20 हजार रुपयांच्या नोटेवर समोरच्या बाजूला गणपतीचे चित्र आहे. तर मागच्या बाजुला एका वर्गाचे चित्र आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दिसत आहेत. नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवंत्रा यांचे चित्र आहे. देवंत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायक राहिले आहेत. इंडोनेशियामध्ये श्रीगणेशाला शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता मानले जाते. श्रीगणेशामुळेच तिथली अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे तिथले लोक मानतात. मात्र, आता ही नोट इंडोनेशियामध्ये चलनात नाही.