
अमेरिकेने व्हेनेझुएला अखेर हल्ला केला आहे. यामुळे व्हेनेझुएला देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या मायकेटिया फ्लाईट इन्फॉर्मेशन रीझन (FIR) म्हणजेच व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात अमेरिकन नागरी विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. यासाठी अमेरिकन प्रशासनाने एक NOTAM (नोटीस टू एअरमन) जारी केला आहे. त्यानुसार व्हेनेझुएलात नागरी विमानांच्या उड्डाणांवर बंदी लादली आहे. हा निर्णय राजधानी काराकस येथे झालेल्या बॉम्ब हल्ले आणि अमेरिकन नागरिकांच्या अटकेनंतर घेण्यात आला आहेत.यानुसार आता अमेरिकन एअरलाईन्स आणि पायलट कोणत्याही उंचीवर विमान उडवू शकणार नाहीत.
या जारी केलेल्या NOTAM च्या नुसार अमेरिकन एअरलाईन्स, अमेरिकन नोंदणीकृत नागरी विमान आणि FAA कडून लायसन्स मिळालेले पायलट व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात कोणत्याही उंचीवर उड्डाण घेऊ शकणार नाहीत. शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये जोरदार धमाके झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या दक्षिण भागात जो एका मोठ्या सैन्य तळाच्या शेजारी आहे, तेथील वीजही गायब झाली आहे. याआधी व्हेनेझुएलाने ५ अमेरिकन नागरिकांना अटक देखील केली होती. ज्यानंतर अमेरिकेने कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.
NOTAM च्या प्रमुख बाबी :
* जारी होण्याची तारीख (UTC): ३ जानेवारी २०२६
* लागू होण्याची तारीख: ३ जानेवारी २०२६, सकाळी 6 वाजता (UTC)
* समाप्तीची तारीख: ४ जानेवारी २०२८ , सकाळी ५ वाजता (UTC)
* स्थिती: सक्रीय * हवाई क्षेत्र: मायकेटिया FIR (व्हेनेझुएला)
हा NOTAM अमेरिकन सैन्य दलाचे विमाने आणि सरकारी विमानांना लागू होणार नाही. याशिवाय विशेष परवानगी घेऊन काही विमान उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते. आपात्कालिन स्थितीत पायलट उड्डाणाच्या सुरक्षेसाठी या आदेशाने अस्थायी रुपात स्वतंत्र निर्णय देखील घेऊ शकतो. हा आदेश अमेरिकन कायद्यांर्गत आपात्कालिन सुरक्षा निर्देशाच्या रुपात जारी करण्यात आलेला आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की येणाऱ्या दिवसात व्हेनेझुएलाच्या विरोधात ऑपरेशन सुरु होऊ शकते. ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना हटवू देखली शकतात. ही माहिती न्यूज एजन्सी रॉयटर्सने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते सुरुवात सिक्रेट ऑपरेशनने होऊ शकते. गेल्या काही आठवड्यात अमेरिकन सैन्याने कॅरेबियन भागात मोठ्या संख्येने जहाजे, विमाने आणि सैनिक तैनात केले आहेत. ज्यामुळे दोन्ही देशात युद्धाची शक्यता वाढली आहे.