AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : पाकिस्तानच्या मैत्रीच्या शपथा धुडकावून इराणने सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं

Iran-Israel War : मध्य पूर्वेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरु आहे. या दरम्यान पाकिस्तानने इराणला एक विनंती केली होती. मैत्रीचे दाखले दिलेले. पण इराणने त्यांना जे हवं तेच केलं.

Iran-Israel War : पाकिस्तानच्या मैत्रीच्या शपथा धुडकावून इराणने सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी मारलं
File Photo
| Updated on: Mar 04, 2026 | 4:30 PM
Share

इराण मिडिल ईस्टमधील देशांवर सतत हल्ले करत आहे. इराणने पाकिस्तानची विनंती धुडकावून लावत सौदी अरेबियावर हल्ला केला आहे. मंगळवारी इराणी ड्रोनमुळे रियादमधील अमेरिकी दूतावासाचं नुकसान झालं. त्यानंतर धाहरान येथे Saudi Aramco या तेल कंपनीचं मुख्यालय आहे, तिथेही मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. पाकिस्तानचे उप पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सोमवारी इराणचे मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सौदी अरेबियावर हल्ला न करण्याची विनंती केली होती. इस्लामाबाद आणि रियादमध्ये झालेल्या संरक्षण कराराचा हवाला देत त्यांनी इराणला सर्तक केलं होतं. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या संरक्षण करारानुसार एका देशावरील हल्ला हा दोन्ही देशावरील हल्ला मानला जाईल असं डार यांनी अराघची यांनी सांगितलं होतं.

आमच्या भूमीवर हल्ला करण्यासाठी सौदीच्या भूमीचा वापर होणार नाही हे आश्वासन द्या असं डार यांना इराणकडून सांगण्यात आलं. पाकिस्तान सोबत चर्चा केल्यानंतरही इराणने मंगळवारी रियाद येथील अमेरिकी दूतावासावर ड्रोन हल्ला केला. सोमवारी रास तनुराच्या प्रमुख तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला झाला. त्यामुळे जागतिक तेल बाजारात चिंता वाढली आहे. अमेरिका सौदी अरेबियाच्या भूमीचा वापर करत आहे. त्यामुळे हा हल्ला होतोय असा दावा इराणने केला.

पाकिस्तान भक्कमपणे सौदी सोबत उभा

सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी शनिवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तान भक्कमपणे सौदी सोबत उभा आहे असं शहबाज शरीफ यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या स्टेटमेंटमध्ये संरक्षण कराराचा स्पष्टपणे उल्लेख नाहीय. पाकिस्तानने इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या आणि संघर्ष आखातामध्ये पसरलाय याची निंदा केली. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट आरोप करणं टाळलं.

एका देशावरील हल्ला हा दोन्ही देशावरील हल्ला मानला जाईल

पाकिस्तान आणि सौदी सरकारमध्ये डिफेन्स पॅक्टवर पहिल्यांदा चर्चा झाली. कुठल्याही एका देशावरील हल्ला हा दोन्ही देशावरील हल्ला मानला जाईल. ऑक्टोंबरपासून पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये दोनवेळा संघर्ष झालाय. पण अजूनपर्यंत या करारावर एकदाही अमलबजावणी झालेली नाही. इस्लामाबाद आणि रियाद दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या संरक्षण कराराविषयी डार यांचं हे वक्तव्य पहिल्यांदा समोर आलय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...